Wednesday, 25 January 2017

Tribute To a Legend .

     महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असणार्या पुण्यामध्ये १५ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट मोहत्सवाचे उद्घाटन झाले.सर्वाच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असणार्या या महोत्सवामध्ये जगातील विविध भाषांतील चित्रपटांची मेजवानी रसिकांसाठी १२ जानें ते १९ जाने. दरम्यान उपलब्ध असणार आहे.गतकाही वर्षांपासून या महोत्सवामध्ये चित्रपट क्षेत्रातील पडद्याआड गेलेल्या तारकांच्या स्मरणार्थ त्यांचे चित्रपटाचे प्रदर्शन करुन एक वेगळ्याच प्रकारे त्यांना श्रद्धांजली देण्यात येते.या वर्षी यामध्ये ओम पुरी,अब्बास कियरोस्तामी,जयललिता,अनिल गांगुली,राजेश पिल्लई,एडवर्ड अल्बि यांच्या कलाकृती दाखवण्यात येतील.

   ६ जानेवारी २०१७ रोजी ह्दयविकाराने ओम् पुरी यांचे निधन झाले.त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी ‘जाने भी दो यारो’ या कला कृतीचे प्र सारण होणार आहे.वास्तववादी अभिनयाला तितक्याच भारदस्त आवाजाची साथ लाभल्याने ओम पुरी यांनी हिंदी चित्रपट सृष्टी मध्ये स्वता:ची एक वेगळीच ओळख निर्माण केली.नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या १९७३ बॅचचे ते विद्यार्थी होते.घाशीराम कोतवाल या मराठी नाटकावर आधारित एका चित्रपटातून ओम पुरी यांनी कारकिर्दीची सुरवात केल्यानंतर 1980 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आक्रोश’ चित्रपटातून त्यांना बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक मिळाला.’आक्रोश’ पासुन त्यांनी सुरु केलेला बाॅलिवूड मधील प्रवास ‘जाने भी दो यारो’,’एक ही मक्सद’,’घायल’,’रंग दे बसंती’,’सद्दगती’,’अर्धसत्य’,’माचिस’,’चाची ४२०’ मार्गे  ‘बजरंगी भाईजान’ पर्यत येउन थांबतो. या शिवाय त्यांनी पंजाबी (लाॅंग दा लष्कारा),तेलगु (अंकुरम), ईंग्रजी (वुल्फ),मल्याळम( पुर्ववृत्तम) अशा भाषांमधुन ही आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.केंद्र सरकारने त्यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानाची दखल घेत त्यांना १९९० साली पद्मश्री पुरस्कारने सन्मानित केले होते.’अर्धसत्य’ चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
    दाक्षिणात्य राजकारण्यांना चित्रपट सृष्टीची पार्श्वभुमी असते असे मानले जाते.एक अभिनेत्री म्हणुन दमदारपणे कारकिर्द गेल्यानंतर तितक्याच दमदारपणे राजकीय क्षेत्रात वावरणार्या काहि मोजक्या कलाकारांमध्ये जयललितांचा समावेश होतो.एआयएडीएमकेच्या सर्वेसर्वा आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचे ५ डिसेंबर रोजी निधन झाले.त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘इज्जत’  या कलाकृती चे प्रसारण होणार आहे.अभिनेत्री ते तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदापर्यंतचा जयललिता यांचा प्रवास थक्क करणारा होता.वयाच्या १५ व्या वर्षी त्यांनी ‘एपिसल’ या ईंग्रजी चित्रपटामधुन  सुरवात केली.त्यांनी कन्नड,तमिळ,हिंदी,ईंग्रजी अशा विविध भाषेमधुन सुमारे ३०० हुन  हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले.दक्षिणात्य चित्रपट सृष्टीमध्ये स्कर्ट परिधान करणार्या त्या पहिल्या अभिनेत्री होय.२० वर्षाच्या कारकिर्दितमध्ये त्यांनी ‘इज्जत’ या एकमेव हिंदी चित्रपटामध्ये काम केले ज्यामध्ये त्यांचा अभिनेता म्हणुन धर्मेंद्र यांनी त्यांना साथ दिली.चित्रपटसृष्टीतून राजकारणात आलेल्या एम जी रामचंद्रन यांनी जयललिता यांना राजकारणात आणण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती.१९९२ रोजी तामिळनाडू च्या सर्वात कमी वयाच्या मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना लाभला.
      जगाला इराणी चित्रपटांची ओळख करुन देणारे दिग्दर्शक अब्बास कायरोस्तामी यांचे निधन ४ जुलै २०१६ रोजी पॅरिस येथे झाले त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ’क्लोज अप’’ या कलाकृतीचे प्रसारण करण्यात येईल. ईस्लामिक क्रांती नंतर निर्मिती आणि कामावर आलेल्या बंधनांवर मात करुन त्यांनी आपले काम सुरु ठेवले.देश सोडण्याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणतात,”जसे झाड एखाद्या ठिकाणाहून नेऊन दुसर्या ठिकाणी लावले असता उगवून येत नाहि,आणि जरी आले तरी त्याच्या फळाचा मुळ स्वाद हरवतो तसेच माझे ही आहे”. न’क्लोज अप’,’टेस्ट आॅफ चेरी’,’वेअर ईज द फ्रेंडस होम’ या सारख्या कलाकृतीमुळे ते सर्वाच्या कायमचे लक्षात रहातील.कवी,पटकथा लेखक,फोटोग्राफी,चित्रपट निर्माता असे अष्टपैलु कलाकार म्हणुन त्यांनी जगाला खुप मोठी देणगी दिली आहे. १९७० पासुन प्रत्यक्ष चित्रपट निर्मिती क्षेत्रात उतरल्यानंतर त्यांनी ४० हुन अधिक अशा लघुचित्रपट,माहितीपटांची निर्मिती केली.त्यांनी अनेक चित्रपट प्रदर्शनांमध्ये परिक्षकाची जबाबदारी ही निभवली आहे.अब्बास  यांचे चित्रपट स्वत:चीच वेगळी भाषा मांडतात म्हणुन त्यांची तुलना सत्यजित राॅय,जॅक्स टटी यांच्यासोबत केली जाते.सिनेमॅटोग्राफिक ची एक वेगळीच ओळख जगाला करुन देणार्या अब्बास यांना ‘पीफ’ कडुन एक आगळीवेगळी श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे.त्यांच्या सोबतच अनिल गांगुली यांची ‘कोरा कागज’,राजेश पिल्लाई यांची ट्राफिक,एडवर्ड एल्बी यांची ‘व्हू ईज अफ्रेड आॅफ वर्जिनिया वूल्फ’ या कलाकृतींचे प्रसारण करण्यात येईल.अशा प्रकारे पडद्यामागे गेलेल्या तारकांना एक वेगळ्या प्रकारे श्रद्धांजली पुणे इंटरनॅशनल फिल्म महोत्सवामध्ये देण्यात येणार आहे.
   

No comments:

Post a Comment