Thursday, 5 January 2017

पैशाचा प्रवास ...छापाई पासुन ते सर्वसामान्यांपर्यत

पैशाचा प्रवास ...छापाई पासुन ते सर्वसामान्यांपर्यत




     केंद्रसरकारने केलेल्या नोटा बंदिमुळे ‘नोटा’ हा विषय सर्वांच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.नोटा कधी,कुठे,कशा,केव्हा,कोण छापल्या जातात? नोटा छापण्यामागचे सरकारचे धोरण? असे अनेक प्रश्न सर्वसामान्य वाचकाला पडत आहेत.नोटा छापण्यामागे केंद्र सरकार,रिझर्व बैंक आॅफ इंडिया,सिक्युरिटी प्रिंटींग अॅण्ड मिंटींग काॅरपोरेशन आॅफ इंडिया लिमीटेड यांची अतिशय महत्त्वाची भुमिका असते.
    नविन अर्थिक वर्ष सुरु होण्याच्या आधी भारतीय रिझर्व बैंक विकास दर आणि होणारे  ‘ई- पेमेंन्ट’ व्यवहारांचा विचार करुन गरज लागणार्या नोटांची आकडेवारी केंद्र सरकारशी विचारविनीमय करुन ठरवण्यात येते.नोटांसाठी लागणार्या उच्च सुरक्षित कागदाची निर्मिती,पुरवठा,रचना ही ‘करन्सी पेपर मिल’ म्हैसर आणि होशंगाबाद येथुन केली जाते.दौन्ही पेपर मिल ’करन्सी पेपर मिल’ म्हैसुर आणि होशंगाबाद यांची एकत्र वार्षिक कागदनिर्मिती क्षमता ही जवळपास अठरा हजार मेट्रिक टन एवढी आहे,गरज पडल्यास नोटांसाठी लागणार्या कागदाची भारत आयत देखिल करतो.
     म्हैसुर आणि होशंगाबाद येथे नोटांसाठी कागद तयार झाला की,तेथेच नोटांच्या सुरक्षिततेसाठी असणारी काही खास वैशिष्ठ्ये जसे की,’मल्टिटोनल’,थ्री डायमेन्शल वाटरमार्क’,’मायक्रो लिट्टेरिंग’,आणि ‘सिक्युरिटी थ्रेड’ नोटेच्या कागदावर मुद्रित करण्यात येतात.अशा रितीने म्हैसुर आणि होशंगाबाद येथेच नोटांचा कागद पुढील छापाईसाठी तयार होतो.
     म्हैसुर आणि होशंगाबाद येथे तयार झालेला कागद पुढील छापाईसाठी म्हैसुर,सालबोनी,देवास,नाशिक अशा चार वेगवेगळ्या ठिकाणी पाठवला जातो जेथे आणखी काही सुरक्षिततेसाठी असणारी वैशिष्ठ्ये जसे की,’आॅप्टिकली व्हेरिअबल इंक’,’रिफ्लेक्टिंग कलर्स’,मुद्रित करण्यात येतात.युरोपमध्ये नोटांच्या डिझाईन अंतिम करण्यास एक वर्ष लागते पण भारतात सध्या चलनात आणलेल्या पाचशे अन हजार च्या नोटांच्या डिझाईनला सहा महिन्यात तयार झाल्यात.यानंतर नोटांच्या छापाईला खरी सुरवात होते.नोटा या ‘शीट’ मध्ये छापल्या जातात.एका शीट वर आताच्या चलनातील दोन हजाराच्या चाळिस नोटा बसतात.छापाईनंतर नोटांचे ‘टेलिस्कोपिक नंबरिंग अॅण्ड कटिंग’ केले जाते.एका पाकिटात अशा शंभर नोटा असतात आणि अशा दहा पाकिटांचे मिळुन एक बंडल तयार होते.
    या छापलेल्या नोटा आता वितरणासाठी तयार असतात.रिझर्व बैंकेचे भारतभर असणार्या एकोणीस आॅफिस मधुन या वितरित होतात.ज्याठिकाणी रिझर्व बैंकेचे आॅफिस नाहीत तेथे या नोटा ‘करंन्सी चेस्ट’ द्वारे वितरीत करण्यात येतात.भारतात साधारणपणे चार हजार  ‘करंन्सी चेस्ट’ आहेत ज्यांना संबंधित राज्य सरकार,पोलिस यांद्वारे सुरक्षा देण्यात येते.’करंन्सी चेस्ट’ मधुन होणारे रोजचे वितरण आणि साठा यांची नोंद रिझर्व बैंक ठेवत असते.रेल्वे वॅगन,ट्रक,यांद्वारे नोटा पोलिसांच्या सुरक्षतेमध्ये वितरीत केल्या जातात.अतिदुर्गम प्रदेश जसे कि जम्मु आणि काश्मिर,उत्तर-पुर्वीय राज्ये येथे हॅलिकाॅप्टर,विमान यांद्वारे नोटा वितरित केल्या जातात.’करंन्सी चेस्ट’ मध्ये असणार्या नोटा या फक्त कागद असतात पण त्या जेव्हा बैकेत येतात तेव्हा त्या चलनी नोटा ठरतात.या चलनी नोटा छापताना त्याला तितक्याच प्रमाणाचा ‘कॅश’,’सिक्युरिटिज’,गव्हरमेंट बाॅन्ड याचा पाठिंबा द्यावा लागतो.
     यानंतर या नोटा बैंक,एटिएमयेथे पोचवण्याची सर्वात मोठी कामगिरी असते.भारतातील २.२लाख एटीएम साठी ७ नोंदणीकृत ‘कॅश लोजिस्टिक फर्म’ च्या ८,८०० ‘कॅश व्हॅन’,कार्यरत आहेत.नविन नोटा मार्केट मध्ये आल्यामुळे एटीएम मध्ये काही तांत्रिक सुधारणा करावी लागत आहेत.दररोज साधारण पणे १३,००० एटीएम अशा वेगाने एटीएम मध्ये तांत्रिक सुधारणा करत असल्याचे लाॅजिस्टिक फर्म कडुन सांगण्यात आले आहे.
      एका एटीएम मध्ये चार ‘कंटेनर’ (कसेट्स)असतात ज्यात प्रत्येकी २५००नोटा भरता येतात,प्रत्येक कंटेनर मध्ये एकाच ‘डिनोमिनेशन’ च्या नोटा भरता येतात.त्यामुळे एका एटीएम ची क्षमता ही १०,००० नोटा एवढीच असते.पाचशे आणि हजार च्या नोटा बंदि मुळे सध्या शंभर च्या नोटांनी २ कसेट्स भरण्यात येत आहे.त्यामुळ एटीएम मध्ये ५ लाख एवढीच रक्कम असते जी की काही तासातच संपते.नविन २००० च्या नोटेनुसार एटीएम मध्ये तांत्रिक सुधारणा केल्यास एटीएम ची क्षमता ६०लाख एवढी होईल ,कि जी साधारणपणे ३००० ग्राहकांना पुरेल.
      नव्या नोटांप्रमाणे एका एटीएम मध्ये तांत्रिक सुधारणा करण्यासाठी साधारणपणे २०मिनीटे एवढा वेळ लागतो.१७नोव्हेबर पर्यत जवळपास २०,००० एटीएम मध्ये तांत्रिक सुधारणा करण्यात आली आहे,सर्व एटीएम मध्ये तांत्रिक सुधारणा होण्यासाठी अजुन २०-२२ दिवस लागतील.
        आकडेवारी नुसार,चलनातील २३०० करोड नोटांना तेवढ्याच नविन नोटा उपलब्ध करुन देण्यास सहा महिन्यांचा कालावधी लागु शकतो.यासंदर्भात माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम म्हणतात,”सर्व नोटा छापणार्या प्रेस ची मर्यादा ही ३०० करोड प्रति महिना एवढी आहे,जर तुम्ही कमी ‘डिनोमिनेशच्या’ (१००,५००रु.) नोटा छापल्यास अजुन पाच पट जास्त वेळ लागेल.सध्या नकली चलनांचे मुल्य हे ४०० करोड रु. आहे कि जे एकुण वितरणाच्या ०.०२८% एवढेच होते.रिझर्व बैंके चे माजी गव्हर्नर के.सी.चक्रवर्ती म्हणतात ”जुन्या नोटांना पुर्णपणे बदलुन नविन नोटा येण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागेल”.
(Published in Loksatta)

2 comments: