२००३ साली सुरु झालेला पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा चा (पिफ) प्रवास आता २०१७ मध्ये १५व्या वर्षांमध्ये पदार्पण करत आहे. दरम्यानच्या काळात पिफ मध्ये बर्याच प्रमाण बदल झाले आहेत.परंतु मुळ उद्देश समोर ठेवुनच केलेले हे बदल स्वागतार्हच आहेत.जसे कि चित्रपटाच्या विविध श्रेण्यांमध्ये केली जाणारी वाढ. या वर्षीच्या १५ व्या पिफ मध्ये विविध १६ श्रेणींमधुन अनेक प्रादेशिक,राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय चित्रपट सहभागी झाले आहेत.आंतरराष्ट्रीय स्पर्धा,मराठी स्पर्धा या श्रेणी बरोबरच मराठी प्रेक्षकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणारी श्रेणी म्हणजे ‘मराठी सिनेमा टुडे’.
भारतीय समाज हा बहु विविध,बहु सांस्कृतिक आहे या बहुसांस्कृतिकतेचा ढाचा हा काळानुरुप बदलत आहे.जेव्हा दोन वेगवेगळ्या संस्कृती एकत्र येतात तेव्हा त्यांतील व्यक्ति आणि समष्ठिंची वर्तुळे एकमेकांमध्ये अशा प्रकारे मिसळुन जातात कि स्वत्वाची वेगळी ओळख ते हरवून बसतात.सध्याच्या जमान्यात प्रचंड प्रमाणात असणार्या सामाजिक जाणिवांमुळे ईथे स्वत्वाच्या कल्पनांना फार कमी जागा मिळते.याचेच विष्लेषण पुढे करताना आपल्याला असेही म्हणता येईल की,प्रत्येक माणूस वेगवेगळ्या पातळ्यांवर स्वता:ची एक वेगळीच ओळख जपत असतो ती जपताना व्यक्ति आणि समष्ठि या द्वंद्वामध्ये तो अडकतो.म्हणुनच जागतिकिकरणा आधी आणि नंतरचा बहुसांस्कृतिक समाज अशी विभागणी होत असताना याचा चित्रपटावर होणारा परिणाम विशेषत: या सगळ्यांमध्ये असणारा आजचा मराठी चित्रपट म्हणुनही ‘मराठी सिनेमा टुडे’ हि श्रेणी महत्वपुर्ण ठरते.
यंदा या श्रेणीमध्ये ‘चिठ्ठी’,’फिरकी’,’उबुन्तुं’,’नाती खेळ’ आणि ‘वेदर रिपोर्ट’ अशा पाच वेगळ्या धाटणींच्या चित्रपटांची पर्वणी प्रेक्षकांसाठी उपलब्ध असणार आहे.’मराठी सिनेमा टुडे’ या श्रेणी बद्दल बोलताना पिफ च्या निवड समितीचे अध्यक्ष समर नकाते म्हणाले,”जे मराठी चित्रपट मराठी स्पर्धा या श्रेणीमध्ये सहभागी होउ शकत नाहित परंतु त्यांना ‘पिफ’ सारखा आंतरराष्ट्रीय मंचावर आपली कलाकृती सादर करावयाची आहे अशा कलाकारांसाठी ही श्रेणी उपयुक्त ठरते.ज्याव्दारे त्यांना प्रदर्शन पुर्व प्रेक्षकांचा प्रतिसाद जाणुन घेण्यास मदत होते”.या श्रेणीसाठी होणार्या निवड प्रक्रियेबद्दल बोलताना समर नकाते म्हणतात,”तब्बल पन्नास हुन अधिक चित्रपट या श्रेणीमध्ये सहभागी होण्यासाठी ईच्छुक होते आणि यातुन पाच चित्रपटांची निवड करणे हि आमच्यासाठी तारेवरची कसरत होती,आम्हाला खात्री आहे आम्ही निवडलेले हे चित्रपट प्रेक्षकांना नक्की आवडतील”.
बदलत्या जगात इंटरनेटच्या वापरामुळे चिठ्ठी,पत्र ही संदेशवहनाची माध्यमे कालबाह्य होत आहेत.आणि नेमकी याच गोष्टीवर बोट ठेवुन दिग्दर्शक वैभव डांगे त्यांची पहिली फिचर फिल्म ‘चिठ्ठी’ ही आपल्या पुढे घेउन येत आहेत.या चित्रपटातील मुख्य पात्र हे चिठ्ठी असुन ती गघाळ झाल्याने (पोस्टमन च्या मुलाकडुन) कथेमध्ये येणारी विनोदात्मकात अतिशय चांगल्या पद्धतीने ते मांडतात.चित्रपटाला कोवळ्या वयातीत प्रेम कथेची झालर देखिल असल्याने चिठ्ठी हा चित्रपट प्रेषकांना एका वेगळ्याच भावविश्वात घेउन जातो.
’काय द्यायचे बोला’,’हापुस’ या सारख्या चित्रपटातील अभिनय आणि ‘हाय काय आणि नाय काय’ या चित्रपटासाठी सहदिग्दर्शक असा अनुभव घेउन मराठी अभिनेता पुष्कर श्रोत्री दिग्दर्शित ‘उबन्तु’ हा चित्रपट घेउन आले आहेत.आगळ्यावेगळ्या नावामुळे पिफ मध्ये हा चित्रपट चर्चेमध्ये आहे.शिक्षण हा एक सामाजिक धागा पकडुन त्याभोवती कथा गुंफण्यात आली आहे.शिक्षणासाठी असणारा संघर्ष,नायकाची विजिगीषुवृत्ती या सर्वामुळे चित्रपट समाजभानाचे एक वेगळे भावविश्व प्रेक्षकांपुढे उभा करतो.
‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’ च्या यशानंतर दिग्दर्शक नागेश भोसले यावेळी घेउन येत आहेत ‘नाती खेळ’ ज्याव्दारे नात्यांमध्ये होणारे खेळ ते पोटतिडकिने मांडत आहेत.नवरा बायको च्या नात्यांमध्ये बायकोचे नायकाच्या भावा सोबत असणारे विवाह बाह्य संबंध यावर पंचायतीने दिलेला निर्णयांवर भोसले भाष्य करु पहात आहेत.विवाहबाह्य या सारख्या विषयाची मांडणी करताना लागणारे धाडस आणि म्हणुनच चित्रपट प्रेक्षकांना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतो.
चित्रपट निर्मिती संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे रवी दावला यावेळी मात्र स्वत: दिग्दर्शित केलेला ‘वेदर रिपोर्ट’ हा एका वेगळ्या वळणाने जाणारा चित्रपट आपल्यासमोर घेऊन येत आहेत.पुणे सारख्या शहरांमधील वाढणारी बहुभाषिक संस्कृती आणि तरुणाई यावर चित्रपटाचे कथानक गुंफले आहे.मराठी,हिंदी,मल्याळम,इंग्रजी अशा भाषेच्या वापरामुळे चित्रपट भाषिक अंगाने समृद्ध तर होतोच पण तितकेच सशक्त कथानका मुळे प्रेक्षकांपुढे वेगवेगळे पदर उलघडुन दाखवतो.विद्यार्थ्यांना एक उत्तम दिग्दर्शन केल्यानंतर आता चित्रपटासाठी लागणार्या दिग्दर्शनाची भूमिकेत रवि दावला कसे निभावतात यावरच चित्रपटाचे यशापयश अवलंबुन असेल.
१८ मे १९१२ साली ‘श्री पुंडलीक’ या चित्रपटापासुन मराठी चित्रपटाचा प्रवास सुरु झाला. १९३२ साली’आयोध्येचा राजा’ पहिला मराठी बोलका चित्रपट नंतर झालेले स्थित्यंतर अनुभवत आज २१ व्या शतकात येउन पोहोचला आहे.व्हि शांताराम,मास्तर विनायक,भालजी पेंढारकर,आचार्य अत्रे यांसारख्या दिग्गज कलाकारांची परंपरा अजुनही पुढे सुरु आहे.’शामची आई’ (सुवर्ण कमळ १९५०) आणि ‘श्वास’ (सुवर्ण कमळ २००४) हे चित्रपट मराठी चित्रपटांमध्ये मैलाचा दगड ठरले आहेत.असेच उत्तोमत्तम मराठी चित्रपट निर्मितीसाठी महाराष्ट्रशासना तर्फे १.५ ते ३ दशलक्ष रुपये आर्थिक मदत तसेच मनोरंजन करामधुन सवलत ही देण्यात येते.
एकंदरीतच एकापेक्षा एक सरस कथानक आणि त्याला तितक्याच सशक्त अभिनयाची जोड मिळाल्याने ‘मराठी सिनेमा टुडे’ खरोखरच एक वेगळा ठरत आहे.जो कि आजच्या मराठी पिढीची भाषा बोलतोय.
Blog masta ahe .. keep it up.. 🤘
ReplyDeletethank you
DeleteChan
ReplyDeleteThank you.
ReplyDelete