Saturday, 7 January 2017

भरकटल्या’शिवाय’ काय ?

भरकटल्या’शिवाय’ काय ?


ना आदि ना अंत। वो सबका ना इनका उनका। वही शुन्य है वही इकाई जिसके भीतर बसा शिवाय।

             बर्फाळलेल्या हिमालयात,निसर्गसौंदर्याची बरसात करत चित्रपट सुरु होतो.आर्मीला मदत करता करता बल्गेरिअन तरुणीशी( एरिका कार) अजय देवगण ची जवळीक वाढते यातुनच पुढे त्यांना कन्यारत्न प्राप्त होते.हे आपत्य नको असल्याने एरिका मायदेशी परतते.अजय देवगण मग तिला कसे वाढवतो हे अतिशय रटाळ रित्या दाखवण्यात आले आहे,पुढे याच मुलीच्या ( अॅबिगेल एम्स) हट्टासाठी तो बल्गेरियात कसा जातो,तेथिल मानवी तस्करीच्या जाळ्यात तो कसा अडकतो? त्यातुन सुटतो का ? हे अतिशय ओढुन ताणुन दाखवण्यात आले आहे.
              मुळात दोन ओळींची असणारी कथा ओढुन-ताणुन १७२मि. करण्यात आली आहे. दर दहा -पंधरा मिनीटांनी रुळावरुन घसरणार्या कथेला रुळावर आणण्याचे काम बॅकग्राउंड म्युझिक करते.अॅक्शन हिरो म्हणुन वाकबगार असणारा अजय देवगण स्वत:च्या भुमिकेला न्याय दिलेला आहे,पण त्याला स्वत:ला भव्यदिव्य दाखवताना चित्रपट स्वकेंद्री झाल्याचे जाणवते म्हणुनच दिग्दर्शनाचे शिवधनुष्य त्याने दुसर्या कोणाकडे तरी द्यावयास हवे होते असे जाणवते.
                 बालकलाकार अॅबिगेल एम्स हीने अजय देवगणच्या मुलीची व्यक्तीरेखा स्वत:च्या दमावर पेलली आहे पण सुमार कथानक अन खराब ऐडिटींग (ऐडिटींग नाहीच केले) यामुळे त्या चिमुकलीचे प्रयत्नही तोकडे पडतात.अॅक्शन सीन मध्ये गाड्यांची उडवाउडवी करताना अजय देवगणला रोहीत शेट्टी होण्याचा मोह दिसतो.सबकुछ अजय देवगण,बघुन धापा टाकत शेवटाकडे येताना प्रेषक अॅक्शन नंतर ईमोशन्स मुळे जरा भावुक होतात पण अयोग्य क्लायमॅक्समुळे तिथेही त्याच्या पदरी निराशाच पडते.
                  पण ज्यांना बल्गेरिया अन हिमालयातील सौंदर्याची सैर या दिवाळीत करावयाची आहे त्यांच्यासाठी हा चित्रपट उत्तम आहे.बाकी अनेक प्रश्न अनुत्तरितच रहातात जसे की अॅबिगेल एम्स कोणाकडे रहाते? एरिका चे पुढे काय होते? हॅकर (वीर दास)चे पुढे काय होते? अन चित्रपट संपतो (संपवला असावा).एक चांगला शेवट करता आला असता पण एकंदरीतच या दिवाळीत चांगल्या चित्रपटांच्या अभावामुळे,सुट्टीचा मौसम, (देशप्रेम) यामुळे चित्रपट ठीकठाक गल्ला गोळा करेल अशी आशा करुयात.

चित्रपट का पाहु नये ?

  • सुमार कथानक
  • ओढुन -ताणुन घेतलेले सिन्स
  • स्वकेंद्री
  • हेतुविरहीत चित्रपटाची वाढवलेली लांबी
  • चघळुन चघळुन चोथा केलेल्या मानवी तस्करीची कथा

चित्रपट का पहावा ?

  • बाप-लेकी च्या नात्यातील भावनीकता
  • बॅकग्राउंड स्कोर,गाणी
  • अजय देवगण,बालकलाकार अॅबिगेल एम्स ,गिरिष कर्नाड यांचा अभिनय
  • निसर्गसौंदर्य
  • सामाजिक विषय हाताळणी

दिग्दर्शन - अजय देवगण
कलाकार- अजय देवगण,एरिका कार,साएशा सेहगल,अॅबिगेल एम्स,वीर दास




No comments:

Post a Comment