Saturday, 4 February 2017

वाचनीय रविवार ०५ फेब्रुवारी २०१७




रविवारी वर्तमानपत्राच्या मुख्य अंका सोबत येणाऱ्या पुरवण्या म्हणजे वाचकांसाठी एक मेजवानीच होय.आठवड्याभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचा या पुरवण्यांमधे ऊहापोह केलेला आपणांस दिसुन येतो.दिग्गज लेखक त्यांचा विविध विषयांचा असणारा व्यासंगी अभ्यास,विषयाची वेगवेगळ्या अंगाने केलेली मांडणी यांमुळे रविवारच्या पुरवण्या वाचकांसोबतच नविन लेखकांसाठी ही अभ्यासाच्या दृष्टीने महत्वाच्या असतात.नेहमीप्रमाणे या रविवारच्या पुरवणी मधील काही वाचनीय लेखांची यादी खाली देत आहे ज्यामुळे तुमचा रविवार वाचनीय होण्यास मदत होईल.

                                                           लोकसत्ता (लोकरंग )

 १ वास्तवाचे ओझे पेलण्यासाठी - आर्थिक पाहणीतील लक्षणीय काही ----दिनेश गुणे 
२ फटफटायला लागलेय  - संतोष कुलकर्णी ( उत्तर प्रदेश  निवडणूक )
३ आवशीची बोली जित्ती र्हवान्दे  - प्रवीण दशरथ बांदेकर 
४ आत्मशोधाची वाटचाल - संचिताचे कवडसे मधून विकास आमटे 
५ पद्मावती ,इतिहास आणि अस्मिता  - हेमंत प्र.  राजोपाध्याय 
६ सेल्फी - राजीव काळे 
७ सरकारने काय करावे - प्रसाद हावळे 

                                                     
                                                    महाराष्ट्र टाइम्स (संवाद )

 ८ असुरक्षितता इथली संपत नाही  - वंदना घोडेकर
९ हवी कायद्याची चाकोरी - दत्ता जाधव 
१०आघाडीने विस्कटली भाजपाची घडी - सुरेश इंगळे 
११ द्या त्यांना हाकलुन - मुग्धा कर्णिक ,ट्रम्पनीतीने संभ्रम - अभिजित शेंडे 
१२ हे वाद थांबणार नाहीत - इब्राहिम अफगाण 
१३ दिल बहलाने के लिये - श्रीरंजन आवटे 
१४ युती कुणाला फळली - नरेश कदम 
१५ मराठी साहित्यचे सीमोल्लंघन - डॉ दामोदर खडसे 
१६ प्राण्यांचे  खेळ कशासाठी ?  - डॉ सतीश पांडे 
१७ ट्रम्प यांचा मुस्लिमद्वेष  - विजय साळुंखे 
१८ युग आभासी मैत्रणीचे - अनिकेत कोनकर 

                                                         सकाळ (सप्तरंग )

 १९ भित्तीलेखनाचा  पंजाबी संदेश - शेखर गुप्ता 
२०परिवर्तनाच्या लाटेवर साथ हवी सर्वांची - वेन्कएया नायडूं 
२१ कायदा झाला पण प्रश्न अनुत्तरितच - प्रीती करमरकर 
२२  ध्रुवीकरण सुटेना - श्रीराम पवार 
२३ स्वप्नभंग की बदलाची नवी संधी ? - डॉ गणेश नटराजन 
२४पैसा फेको तमाशा देखो - फिरस्ती मधून उत्तम कांबले 
२५ नेमके चित्र मोजके शब्द - अश्विनी देशपांडे 
२६ महाराष्ट्राचं भाषिक स्वराज्य - सदानंद मोरे 
२७ टिक टिक वाजते डोक्यात  - आनंद घैसास ( विज्ञान जिज्ञासा मधून ) 

                                                                                                           
                                                      पुढारी (बहार )

२८ बजेटचा अर्थ  - डॉ विनायक गोविलकर 
२९ अलनिनो आणि पावसाची सरासरी - राजीव मुळे 
३० स्वार्म इंटेलिजन्स -प्रदीपकुमार माने 
३१ जागतिकिकरणाची उलटे चक्र - डॉ उत्तरा सहस्त्रबुद्धे 
३२ अचूक अंदाजांचे आव्हान - डॉ बुधाजीराव मुळीक 



Saturday, 28 January 2017

वाचनीय रविवार २९ जानेवारी २०१७


रविवारी वर्तमानपत्राच्या मुख्य अंका सोबत येणाऱ्या पुरवण्या म्हणजे वाचकांसाठी एक मेजवानीच होय.आठवड्याभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचा या पुरवण्यांमधे ऊहापोह केलेला आपणांस दिसुन येतो.दिग्गज लेखक त्यांचा विविध विषयांचा असणारा व्यासंगी अभ्यास,विषयाची वेगवेगळ्या अंगाने केलेली मांडणी यांमुळे रविवारच्या पुरवण्या वाचकांसोबतच नविन लेखकांसाठी ही अभ्यासाच्या दृष्टीने महत्वाच्या असतात.नेहमीप्रमाणे या रविवारच्या पुरवणी मधील काही वाचनीय लेखांची यादी खाली देत आहे ज्यामुळे तुमचा रविवार वाचनीय होण्यास मदत होईल.


                                                           लोकसत्ता (लोकरंग )

१ भारत लोकशाही मुक्त होत आहे - डॉ.भालचंद्र मुणगेकर 
२ भाग बादल भाग - संतोष कुलकर्णी ( पंजाब निवडणूक )
३ लक्ष्मी बार - गिरीश कुबेर (निश्चलनीकरणा नंतर येणारा अर्थसंकल्प )
४ गांधी ;एक युगमुद्रा  - संचिताचे कवडसे मधून विकास आमटे 
५ सदरलेखन आणि मी - डॉ.अरुण टिकेकर यांच्या 'कालचक्र ' या लेखसंग्रह मधील प्रस्तावनेच काही भाग 
६ विचाराने ज्ञान वाढते,नीति सुधारते - प्रसाद हावळ

                                                     महाराष्ट्र टाइम्स (संवाद )

७ वुई विल स्टिल राइस - प्रतिमा जोशी ( लिंडा सासर्र आणि होणारे ट्रोलिंग )
८ खदखदत आहे अस्वस्थता - डॉ वसंत काळपांडे ( महाराष्ट्रातील शैक्षणीक स्थिति वर भाष्य)
९ शेतीचा समग्र विचार हवा - डॉ वसंतराव जुगले 
१० करसवलतीची दंगल घडणार का ? - विहंग घाटे 
११ प्रियंका...अखेरच अस्र - सुनील चावके 
१२ कवितेचा 'साजण'- डॉ तीर्थराज कापगते 
१३ द्रविड़ी प्राणायाम कशाला ? - श्रीपाद ब्रह्मे ( राहुल द्रविड ने नम्रतेन नाकारलेली डॉक्टरेट)
१४ गरिबी हिच प्रेरणा - साहित्यिक दयाराम पाडलोस्कर यांची मुलाखत 

                                                         सकाळ (सप्तरंग )

१५ ट्विट्टरविना वाचाळता व्यर्थ आहे - शेखर गुप्ता 
१६ जलिकट्टू वरील उद्रेकाच्या अंतरंगात...- वॉल्टर स्कॉट चेन्नई 
१७ ट्रम्प यांच्या अण्वस्त्र धोरणाची वाढती चिंता - विजय नाईक 
१८ ट्रम्प यांनी 'करून दाखवल'- श्रीराम पवार 
१९ अर्थ आणि संकल्प -डॉ दिलीप सातभाई 
२० आतनं पॉवरफुल सपोर्ट हाय - फिरस्ती मधून उत्तम कांबले 
२१ चित्रसूत्रा च अवतरण - मंगेश काले 
२२ स्वतःला ओळखण्यासाठी स्वतःच विचार करा - डॉ यशवंत थोरात 

                                                       लोकमत (मंथन )

२३ लोकग्रह आणि साहित्य - डॉ अक्षयकुमार काले यांच्याशी संवाद 
२४ पर्यायी वास्तवाचं ट्रम्प युग - प्रकाश बाळ 
२५ कॅस्ट्रोनची मैत्रीण - निळू दामले 
२६ टीबीचे रुग्ण - शशिकांत सावंत ( स्टोरी च्या मागे धावताना पत्रकारांसाठी वाचनीय )

                                                       प्रभात ( रुपगंध )

२७ अंमलबजावणीवर भर हवा - चंद्रशेखर टिळक 
२८ अर्थसंकल्प ठरेल दिलासादायक? - डॉ जे एफ पाटील 
२९ शब्दांवर प्रेम करणारा जयपूर चा साहित्य सोहळा - श्रीनिवास वारुंजीकर 
                                                    
                                                      पुढारी (बहार )

३० 'अमेरिका फर्स्ट' धोक्याची घंटा - अनिल टाकलकर 
३१ विजया  चतुरस्र लेखिकेचा गौरव - डॉ अश्विनी धोंगडे 
३२ सत्तेच्या मध्यांतरातील अर्थसंकल्प - डॉ अनंत सरदेशमुख 
३३ परंपरा हव्यात पण व्यवसायिकीकरण  नको - राजीव मुळे 
३४ फाइव जी च्या आगमनाने - महेश कोळी 


रईस च्या 'काबिलीयत' वर प्रश्नचिन्ह




दिग्दर्शक राहुल ढोलकिया ‘परझानिया’ नंतर ‘रईस’ द्वारे पुन्हा एकदा गुजरात मधील परिस्थितीवर भाष्य करु पहात आहे (नमो नम:). यावेळेस त्यांच्या सोबत आहे किंग खान पण चावून चोथा झालेल्या कथानकापुढे किंग खान तर काय करणार बिचारा!! चित्रपट प्रदर्शनापूर्वी  कैलास विजयवर्गीय यांचे ट्विट,पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हिचा चित्रपटातील सहभाग,शिय्या पंथीय मुस्लिमांच्या भावना दुखावणे,प्रदर्शन तारीख अशा वादांमध्ये अडकला असतानाच (नविन मार्केटिंग स्टाईल) बॉक्स ऑफिस कलेक्शन वर याचा किती परिणाम होतो हे पहाणे गरजेचे आहे.
  चित्रपटातील कथानकाचा वास्तवाशी काहीही संबंध नाही असा दावा जरी दिग्दर्शक राहुल ढोलकिया करत असले तरी खरे काय हे समजण्या इतपत प्रेक्षक नक्कीच ‘काबिल’ आहेत.रईस ची कथा गुजरात मधील दारु माफ़िया अब्दुल लतीफ याच्या जीवनावर आधारित आहे.८०-९० च्या दशकामधील कथानक पडद्यावर साकारण्यामध्ये दिग्दर्शक राहुल यशस्वी ठरले आहेत.रईस आलम (शाहरुख़ खान) त्याच्या आईसोबत गरीबी मध्ये रहात असतात.पैशासाठी लहानपणा पासुनच तो जयराज शेठ (अतुल कुलकर्णी) साठी काम करत असतो. या कामा मध्ये त्याला सादिक़ (मोहम्मद ज़ीशान अय्यूब) मदत करत असतो.”कोई भी धंदा छोटा नही होता और, धंदे से बडा कोई धर्म नही होता” असा आईने दिलेला सल्ला लक्षात ठेवुन विजिगिषु वृत्ती मुळे धंद्यात तो एक मोठा खेळाडु बनतो.रईस च्या जीवनात पुढे रोमान्स,अॅक्शन,यातुन राजकारण कसे येते ? धंदा करत असताना स्वतःची तत्वे आणि ती जपण्यासाठी चा संघर्ष,मुजुमदार (नवाज़ुद्दीन सिद्दीक़ी) त्याला वेळोवेळी कसा विरोध करतो ? वाईट धंदे करुन देखिल रईस मसिहा कसा बनतो? या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला चित्रपट बघितल्या नंतरच मिळतील.


    चित्रपटाची गाडी मध्यांतरानंतर रुळावरुन घसरल्याचे जाणवते.शाहरुख खान च्या हातात चित्रपटाचे स्टिअरींग आहे.नायिका आसिया (माहिरा ख़ान) हि अभिनया मध्ये तितकी सरस वाटत नाही. चित्रपटातील एका सीन मध्ये आसिया गर्भवती असताना तीचे पोट दाखविण्यास दिग्दर्शक कदाचित विसरला असावा.यामध्ये भर म्हणुन की काय,मध्यांतरा आधी आणि नंतर असे दोन खलनायक असणारे दोन वेगवेगळे चित्रपट पाहिल्या सारखे वाटते. सनी चे आयटम साॅंग आणि त्याचवेळी पडद्यावर येणारी दृश्ये यांचा संबंध सुटल्यासारखा वाटतो.बाॅलिवुड मध्ये बर्याचदा वापरण्यात आलेल्या कथानकाच्या धर्तीवर असणारा हा चित्रपट आणि उगाचच नायकाला ‘गरिबोंका मसिहा’ दाखवण्यासाठी कथानकामध्ये ओढुनताणून आणलेले राजकारण,दहशतवाद यांमुळे चित्रपट फक्त एकदा बघण्यापुरताच मर्यादित रहातो.

  सिनेमॅटोग्राफी,संगित,नृत्य याबाबतीत चित्रपट उत्तम आहे.शाहरुख खान पडद्यावर दिसताच मिळणाऱ्या टाळ्या आणि शिट्ट्या सर्वकाही सांगुन जातात पण लक्षात रहातो तो नवाजुद्दीन. हलक्याफुलक्या डायलाॅग मुळे नवाज़ुद्दीन ने एक वेगळाच ठसा उमटवला आहे.कित्येकदा शाहरुख आणि नवाजुद्दीन यांच्या पडद्या-वरील एकत्र सीन्स मध्ये नवाजुद्दीनच उजवा ठरतो.मोहम्मद ज़ीशान,अतुल कुलकर्णी यांनीही आपापली भुमिका चोख बजावली आहे.एकुणच काय गत चित्रपटाच्या अपयशामुळे शाहरुख खान ची या चित्रपटाकडुन असणारी अपेक्षा कितपत पुर्ण होईल हे पाहण्यासारखे आहे.पण प्रभावी  ट्रेलर आणि पब्लिसिटी यामुळे निर्माण झालेल्या अपेक्षांच्या आसपास हि हा चित्रपट पोहोचत नाहि.पण दंगल चित्रपटामध्ये दाखवल्याप्रमाणे ‘शाहरुख को कभी ना नही बोलते’ अशा शाहरुख़ प्रेमीसाठी साठी हा चित्रपट नक्किच एक पर्वणी ठरेल.


 


Wednesday, 25 January 2017

Tribute To a Legend .

     महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असणार्या पुण्यामध्ये १५ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट मोहत्सवाचे उद्घाटन झाले.सर्वाच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असणार्या या महोत्सवामध्ये जगातील विविध भाषांतील चित्रपटांची मेजवानी रसिकांसाठी १२ जानें ते १९ जाने. दरम्यान उपलब्ध असणार आहे.गतकाही वर्षांपासून या महोत्सवामध्ये चित्रपट क्षेत्रातील पडद्याआड गेलेल्या तारकांच्या स्मरणार्थ त्यांचे चित्रपटाचे प्रदर्शन करुन एक वेगळ्याच प्रकारे त्यांना श्रद्धांजली देण्यात येते.या वर्षी यामध्ये ओम पुरी,अब्बास कियरोस्तामी,जयललिता,अनिल गांगुली,राजेश पिल्लई,एडवर्ड अल्बि यांच्या कलाकृती दाखवण्यात येतील.

   ६ जानेवारी २०१७ रोजी ह्दयविकाराने ओम् पुरी यांचे निधन झाले.त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी ‘जाने भी दो यारो’ या कला कृतीचे प्र सारण होणार आहे.वास्तववादी अभिनयाला तितक्याच भारदस्त आवाजाची साथ लाभल्याने ओम पुरी यांनी हिंदी चित्रपट सृष्टी मध्ये स्वता:ची एक वेगळीच ओळख निर्माण केली.नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या १९७३ बॅचचे ते विद्यार्थी होते.घाशीराम कोतवाल या मराठी नाटकावर आधारित एका चित्रपटातून ओम पुरी यांनी कारकिर्दीची सुरवात केल्यानंतर 1980 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आक्रोश’ चित्रपटातून त्यांना बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक मिळाला.’आक्रोश’ पासुन त्यांनी सुरु केलेला बाॅलिवूड मधील प्रवास ‘जाने भी दो यारो’,’एक ही मक्सद’,’घायल’,’रंग दे बसंती’,’सद्दगती’,’अर्धसत्य’,’माचिस’,’चाची ४२०’ मार्गे  ‘बजरंगी भाईजान’ पर्यत येउन थांबतो. या शिवाय त्यांनी पंजाबी (लाॅंग दा लष्कारा),तेलगु (अंकुरम), ईंग्रजी (वुल्फ),मल्याळम( पुर्ववृत्तम) अशा भाषांमधुन ही आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.केंद्र सरकारने त्यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानाची दखल घेत त्यांना १९९० साली पद्मश्री पुरस्कारने सन्मानित केले होते.’अर्धसत्य’ चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
    दाक्षिणात्य राजकारण्यांना चित्रपट सृष्टीची पार्श्वभुमी असते असे मानले जाते.एक अभिनेत्री म्हणुन दमदारपणे कारकिर्द गेल्यानंतर तितक्याच दमदारपणे राजकीय क्षेत्रात वावरणार्या काहि मोजक्या कलाकारांमध्ये जयललितांचा समावेश होतो.एआयएडीएमकेच्या सर्वेसर्वा आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचे ५ डिसेंबर रोजी निधन झाले.त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘इज्जत’  या कलाकृती चे प्रसारण होणार आहे.अभिनेत्री ते तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदापर्यंतचा जयललिता यांचा प्रवास थक्क करणारा होता.वयाच्या १५ व्या वर्षी त्यांनी ‘एपिसल’ या ईंग्रजी चित्रपटामधुन  सुरवात केली.त्यांनी कन्नड,तमिळ,हिंदी,ईंग्रजी अशा विविध भाषेमधुन सुमारे ३०० हुन  हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले.दक्षिणात्य चित्रपट सृष्टीमध्ये स्कर्ट परिधान करणार्या त्या पहिल्या अभिनेत्री होय.२० वर्षाच्या कारकिर्दितमध्ये त्यांनी ‘इज्जत’ या एकमेव हिंदी चित्रपटामध्ये काम केले ज्यामध्ये त्यांचा अभिनेता म्हणुन धर्मेंद्र यांनी त्यांना साथ दिली.चित्रपटसृष्टीतून राजकारणात आलेल्या एम जी रामचंद्रन यांनी जयललिता यांना राजकारणात आणण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती.१९९२ रोजी तामिळनाडू च्या सर्वात कमी वयाच्या मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना लाभला.
      जगाला इराणी चित्रपटांची ओळख करुन देणारे दिग्दर्शक अब्बास कायरोस्तामी यांचे निधन ४ जुलै २०१६ रोजी पॅरिस येथे झाले त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ’क्लोज अप’’ या कलाकृतीचे प्रसारण करण्यात येईल. ईस्लामिक क्रांती नंतर निर्मिती आणि कामावर आलेल्या बंधनांवर मात करुन त्यांनी आपले काम सुरु ठेवले.देश सोडण्याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणतात,”जसे झाड एखाद्या ठिकाणाहून नेऊन दुसर्या ठिकाणी लावले असता उगवून येत नाहि,आणि जरी आले तरी त्याच्या फळाचा मुळ स्वाद हरवतो तसेच माझे ही आहे”. न’क्लोज अप’,’टेस्ट आॅफ चेरी’,’वेअर ईज द फ्रेंडस होम’ या सारख्या कलाकृतीमुळे ते सर्वाच्या कायमचे लक्षात रहातील.कवी,पटकथा लेखक,फोटोग्राफी,चित्रपट निर्माता असे अष्टपैलु कलाकार म्हणुन त्यांनी जगाला खुप मोठी देणगी दिली आहे. १९७० पासुन प्रत्यक्ष चित्रपट निर्मिती क्षेत्रात उतरल्यानंतर त्यांनी ४० हुन अधिक अशा लघुचित्रपट,माहितीपटांची निर्मिती केली.त्यांनी अनेक चित्रपट प्रदर्शनांमध्ये परिक्षकाची जबाबदारी ही निभवली आहे.अब्बास  यांचे चित्रपट स्वत:चीच वेगळी भाषा मांडतात म्हणुन त्यांची तुलना सत्यजित राॅय,जॅक्स टटी यांच्यासोबत केली जाते.सिनेमॅटोग्राफिक ची एक वेगळीच ओळख जगाला करुन देणार्या अब्बास यांना ‘पीफ’ कडुन एक आगळीवेगळी श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे.त्यांच्या सोबतच अनिल गांगुली यांची ‘कोरा कागज’,राजेश पिल्लाई यांची ट्राफिक,एडवर्ड एल्बी यांची ‘व्हू ईज अफ्रेड आॅफ वर्जिनिया वूल्फ’ या कलाकृतींचे प्रसारण करण्यात येईल.अशा प्रकारे पडद्यामागे गेलेल्या तारकांना एक वेगळ्या प्रकारे श्रद्धांजली पुणे इंटरनॅशनल फिल्म महोत्सवामध्ये देण्यात येणार आहे.
   

Saturday, 21 January 2017

मराठी सिनेमा टुडे




 २००३ साली सुरु झालेला पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा चा (पिफ) प्रवास आता २०१७ मध्ये १५व्या वर्षांमध्ये पदार्पण करत आहे. दरम्यानच्या काळात  पिफ मध्ये बर्याच प्रमाण बदल झाले आहेत.परंतु मुळ उद्देश समोर ठेवुनच केलेले हे बदल स्वागतार्हच आहेत.जसे कि चित्रपटाच्या विविध श्रेण्यांमध्ये केली जाणारी वाढ. या वर्षीच्या १५ व्या पिफ मध्ये विविध १६ श्रेणींमधुन अनेक प्रादेशिक,राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय चित्रपट सहभागी झाले आहेत.आंतरराष्ट्रीय स्पर्धा,मराठी स्पर्धा या श्रेणी बरोबरच मराठी प्रेक्षकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणारी श्रेणी म्हणजे ‘मराठी सिनेमा टुडे’.
       भारतीय समाज हा बहु विविध,बहु सांस्कृतिक आहे या बहुसांस्कृतिकतेचा ढाचा हा काळानुरुप बदलत आहे.जेव्हा दोन वेगवेगळ्या संस्कृती एकत्र येतात तेव्हा त्यांतील व्यक्ति आणि समष्ठिंची वर्तुळे एकमेकांमध्ये अशा प्रकारे मिसळुन जातात कि स्वत्वाची वेगळी ओळख ते हरवून बसतात.सध्याच्या जमान्यात प्रचंड प्रमाणात असणार्या सामाजिक जाणिवांमुळे ईथे स्वत्वाच्या कल्पनांना फार कमी जागा मिळते.याचेच विष्लेषण पुढे करताना आपल्याला असेही म्हणता येईल की,प्रत्येक माणूस वेगवेगळ्या पातळ्यांवर स्वता:ची एक वेगळीच ओळख जपत असतो ती जपताना व्यक्ति आणि समष्ठि या द्वंद्वामध्ये तो अडकतो.म्हणुनच जागतिकिकरणा आधी आणि नंतरचा बहुसांस्कृतिक समाज अशी विभागणी होत असताना याचा चित्रपटावर होणारा परिणाम विशेषत: या सगळ्यांमध्ये असणारा आजचा मराठी चित्रपट म्हणुनही ‘मराठी सिनेमा टुडे’ हि श्रेणी महत्वपुर्ण ठरते.
     यंदा या श्रेणीमध्ये ‘चिठ्ठी’,’फिरकी’,’उबुन्तुं’,’नाती खेळ’ आणि ‘वेदर रिपोर्ट’ अशा पाच वेगळ्या धाटणींच्या चित्रपटांची पर्वणी प्रेक्षकांसाठी उपलब्ध असणार आहे.’मराठी सिनेमा टुडे’ या श्रेणी बद्दल बोलताना पिफ च्या निवड समितीचे अध्यक्ष समर नकाते म्हणाले,”जे मराठी चित्रपट मराठी स्पर्धा या श्रेणीमध्ये सहभागी होउ शकत नाहित परंतु त्यांना ‘पिफ’ सारखा आंतरराष्ट्रीय मंचावर आपली कलाकृती सादर करावयाची आहे अशा कलाकारांसाठी ही श्रेणी उपयुक्त ठरते.ज्याव्दारे त्यांना प्रदर्शन पुर्व प्रेक्षकांचा प्रतिसाद जाणुन घेण्यास मदत होते”.या श्रेणीसाठी होणार्या निवड प्रक्रियेबद्दल बोलताना समर नकाते म्हणतात,”तब्बल पन्नास हुन अधिक चित्रपट या श्रेणीमध्ये सहभागी होण्यासाठी  ईच्छुक होते आणि यातुन पाच चित्रपटांची निवड करणे हि आमच्यासाठी तारेवरची कसरत होती,आम्हाला खात्री आहे आम्ही निवडलेले हे चित्रपट प्रेक्षकांना नक्की आवडतील”.
     बदलत्या जगात इंटरनेटच्या वापरामुळे चिठ्ठी,पत्र ही संदेशवहनाची माध्यमे कालबाह्य होत आहेत.आणि नेमकी याच गोष्टीवर बोट ठेवुन दिग्दर्शक वैभव डांगे त्यांची पहिली फिचर फिल्म ‘चिठ्ठी’ ही आपल्या पुढे घेउन येत आहेत.या चित्रपटातील मुख्य पात्र हे चिठ्ठी असुन ती गघाळ झाल्याने (पोस्टमन च्या मुलाकडुन) कथेमध्ये येणारी विनोदात्मकात अतिशय चांगल्या पद्धतीने ते मांडतात.चित्रपटाला कोवळ्या वयातीत प्रेम कथेची झालर देखिल असल्याने चिठ्ठी हा चित्रपट प्रेषकांना एका वेगळ्याच भावविश्वात घेउन जातो.


    मकरसंक्रांतीच्या पर्वांमध्ये सगळीकडे पतंग उडवण्याची धमाल सुरु असतानाच हीच  धमाल ‘फिरकी’ द्वारे दिग्दर्शक संकेत गांधी आपल्यासाठी मोठ्या पडद्यावर घेउन येत आहेत.सर्वसामान्य घरातील मुलगा,त्याचा पतंग उडण्याचा असणारा छंद आणि यातुनच त्याच्या वर्गातील एका मुलाकडून घडले ल्या घटनेमुळे चित्रपटाला कलाटणी मिळते.बदला घेण्याच्या नादात मग तो मित्र काय,कसे करतो हे बघण्यासारखे आहे.
    ’काय द्यायचे बोला’,’हापुस’ या सारख्या चित्रपटातील अभिनय आणि ‘हाय काय आणि नाय काय’ या चित्रपटासाठी सहदिग्दर्शक असा अनुभव घेउन मराठी अभिनेता पुष्कर श्रोत्री दिग्दर्शित ‘उबन्तु’ हा चित्रपट घेउन आले आहेत.आगळ्यावेगळ्या नावामुळे पिफ मध्ये हा चित्रपट चर्चेमध्ये आहे.शिक्षण हा एक सामाजिक धागा पकडुन त्याभोवती कथा गुंफण्यात आली आहे.शिक्षणासाठी असणारा संघर्ष,नायकाची विजिगीषुवृत्ती या सर्वामुळे चित्रपट समाजभानाचे एक वेगळे भावविश्व प्रेक्षकांपुढे उभा करतो.
     ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’ च्या यशानंतर दिग्दर्शक नागेश भोसले यावेळी घेउन येत आहेत ‘नाती खेळ’ ज्याव्दारे नात्यांमध्ये होणारे खेळ ते पोटतिडकिने मांडत आहेत.नवरा बायको च्या नात्यांमध्ये बायकोचे नायकाच्या भावा सोबत असणारे विवाह बाह्य संबंध यावर पंचायतीने दिलेला निर्णयांवर भोसले भाष्य करु पहात आहेत.विवाहबाह्य या सारख्या विषयाची मांडणी करताना लागणारे धाडस आणि म्हणुनच चित्रपट प्रेक्षकांना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतो.
      चित्रपट निर्मिती संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे रवी दावला यावेळी मात्र स्वत: दिग्दर्शित केलेला ‘वेदर रिपोर्ट’ हा एका वेगळ्या वळणाने जाणारा चित्रपट आपल्यासमोर घेऊन येत आहेत.पुणे सारख्या शहरांमधील वाढणारी बहुभाषिक संस्कृती आणि तरुणाई यावर चित्रपटाचे कथानक गुंफले आहे.मराठी,हिंदी,मल्याळम,इंग्रजी अशा भाषेच्या वापरामुळे चित्रपट भाषिक अंगाने समृद्ध तर होतोच पण तितकेच सशक्त कथानका मुळे प्रेक्षकांपुढे वेगवेगळे पदर उलघडुन दाखवतो.विद्यार्थ्यांना एक उत्तम दिग्दर्शन केल्यानंतर आता चित्रपटासाठी लागणार्या दिग्दर्शनाची भूमिकेत रवि दावला कसे निभावतात यावरच चित्रपटाचे यशापयश अवलंबुन असेल.

     १८ मे १९१२ साली ‘श्री पुंडलीक’ या चित्रपटापासुन मराठी चित्रपटाचा प्रवास सुरु झाला. १९३२ साली’आयोध्येचा राजा’ पहिला मराठी बोलका चित्रपट नंतर झालेले स्थित्यंतर अनुभवत आज २१ व्या शतकात येउन पोहोचला आहे.व्हि शांताराम,मास्तर विनायक,भालजी पेंढारकर,आचार्य अत्रे यांसारख्या दिग्गज कलाकारांची परंपरा अजुनही पुढे सुरु आहे.’शामची आई’ (सुवर्ण कमळ १९५०) आणि ‘श्वास’ (सुवर्ण कमळ २००४) हे चित्रपट मराठी चित्रपटांमध्ये मैलाचा दगड ठरले आहेत.असेच उत्तोमत्तम मराठी चित्रपट निर्मितीसाठी महाराष्ट्रशासना तर्फे  १.५ ते ३ दशलक्ष रुपये आर्थिक मदत तसेच  मनोरंजन करामधुन सवलत ही देण्यात येते.
     एकंदरीतच एकापेक्षा एक सरस कथानक आणि त्याला तितक्याच सशक्त अभिनयाची जोड मिळाल्याने ‘मराठी सिनेमा टुडे’ खरोखरच एक वेगळा ठरत आहे.जो कि आजच्या मराठी पिढीची भाषा बोलतोय.
 
   
   
         

Monday, 9 January 2017

अमेरिका विकसित देश नाही - एरिन पॅक्सान

सायली खांडेकर
श्रीनिवास देशपांडे

अमेरिका विकसित देश नाही - एरिन पॅक्साॅन

कॅलिफोर्निया (अमेरिका) स्थित राज्यशास्त्राची विद्यार्थी असणारी एरिन पॅक्साॅन हिच्याशी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुक २०१६ संदर्भात केलेली बातचीत.

     ‘विकास’ ही न थांबणारी प्रक्रिया आहे. ती अखंड चालु रहाणार आहे नव्हे ती तशी चालु रहाण्यामध्येच जगाचे हित सामावले आहे.अमेरिकेला अजुनही खुप क्षेत्रामध्ये विकास करण्यास वाव आहे म्हणुनच अमेरिका हा विकसित देश नाही असे एरिन पॅक्साॅन म्हणते.
      संख्यात्मक विकासाच्या मागे लागण्यापेक्षा गुणात्मक विकासावर सर्वच देशांनी भर द्यावा असे सांगताना एरिन म्हणते, नुसते फुगीर आकडेवारी जाहीर करुन विकास साधता येत नाही. विकासाच्या प्रक्रियेमध्ये त्याच्या दृश्य परिणामाला खुप महत्त्व आहे,जो की सर्वसमावेशी असेल.
     भारतीय निवडणुक प्रक्रिया आणि भारतीय लोकशाही यांचा अभ्यास करण्यासाठी एरिन पॅक्साॅन हीने सावित्रिबाई फुले विद्यापिठाच्या वृत्तपत्रविद्या व वृत्तसंकलन विभागाला भेट दिली.अमेरिकेमध्ये सध्या असणारी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीची धुळधाण याबद्दल बोलताना एरिन म्हणाली,”ट्रॅम्प ला मत देण्याबाबत साधा विचार करणे म्हणजे अमेरिका अन, पर्यायाने जगाला संकटाच्या खाईत ढकलण्याचा विचार केल्यासारखे होईल”. वाचाळगिरी करणारा ट्रॅम्प निवडुन येणे म्हणजेच अमेरिकाचा पराभव असेल असे तीला वाटते.
     आशिया खंडात, त्यातल्या त्यात भारतात होणारे पाश्चिमात्यांचे अनुकरणा बाबत विचारले असता एरिन म्हणते,एखाद्याचे अनुकरण करणे हा मानवाचा स्वभावच आहे पण, जेव्हा विकासाचा मुद्दा येतो तेव्हा प्रत्येक देशाने विकासाचे स्वत:चे माॅडेल तयार करावे.असे माॅडेल कि जे भिन्न भिन्न क्षेत्रात एक आदर्श माॅडेल ठरले जावे. कारण,प्रत्येक देशाची भौगोलिक,सांस्कृतिक,लोकसंख्यात्मक,आर्थिक पार्श्वभुमी भिन्न भिन्न आहे.
     अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकी च्या प्रचाराबाबत बोलताना एरिन म्हणते, या वेळी प्रचाराची पातळी ही नेहमी पेक्षा जास्तच खालावली आहे,वैयक्तीक शेरेबाजीबरोबर कौटुंबिक शेरेबाजी तीला अस्वस्थ करते,त्याचबरोबर या प्रचारात होणार्या प्रचंड खर्चाला लगाम असावा असे ती म्हणते.
    स्थलांतरितांच्या प्रश्न हा प्रचाराचा मुद्दाच होउ शकत नाही असे एरिन ला वाटते कारण,अमेरिका हा देशच मुळातच स्थलांतरिताचा देश आहे,तिथे काम मिळवणारा प्रत्येक जण हा त्याच्या गुणवत्तेनुसार काम मिळवत असतो.अमेरिकेला घडवण्यांमध्ये स्थलांतरितांचा खुप मोठा वाटा अाहे.
    वर्णभेदामधुन अमेरिका आजही बाहेर पडु शकला नाही हे ओबामा सरकारचे अपयश आहे असे एरिन ला वाटते, कारण आज ही अमेरिकेमध्ये कृष्णवर्णीयांना भेदभाव ला सामोरे जावे लागते.हाच तेथिल यावर्षीच्या निवडणुकीतील महत्त्वाचा मुद्दा आहे.
   आज बराक ओबामा राष्ट्राध्यक्षाच्या खुर्ची वरुन पायउतार होताना अमेरिकेपुढील महत्त्वाचे प्रश्न कोणते या प्रश्नावर उत्तर देताना एरिन म्हणते,उच्चशिक्षणाच्या असणार्या प्रचंड किंमती,वर्णभेद,पर्यावरण,उजव्या विचारसारणीचा उदय ई.महत्त्वाच्या समस्या अमेरिकेपुढे आहेत पण आर्थिक मंदीतुन झालेली सुधारणा,समलैंगिक विवाह मान्यता यासारखे महत्त्वाचे कार्य ओबामा प्रशासनाने केल्याचे ती आवर्जुन सांगते.
   भारतीय निवडणुकी बद्दल विचारले असता ती म्हणते,पैसे वाटप, जाती-पाती या आधारावरच बहुतांश मतदान होते,विचारधारेवर आधारित मतदान होत नाही हेच अमेरिकेतही वर्णावर आधारित मतदान होते हेही ती सांगण्यास विसरली नाही.जगातील सर्वात जुनी लोकशाही अन जगातील सर्वात मोठी लोकशाही यां दोघांना एकमेकांकडुन खुप काही शिकण्यासारखे आहे.
    एकुणच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील चर्चेचे मुद्दे अन याकडे अमेरिकन तरुणाई कसे पहाते,याचा काहीसा अंदाज एरिन शी बोलल्यावर आला.


Saturday, 7 January 2017

भरकटल्या’शिवाय’ काय ?

भरकटल्या’शिवाय’ काय ?


ना आदि ना अंत। वो सबका ना इनका उनका। वही शुन्य है वही इकाई जिसके भीतर बसा शिवाय।

             बर्फाळलेल्या हिमालयात,निसर्गसौंदर्याची बरसात करत चित्रपट सुरु होतो.आर्मीला मदत करता करता बल्गेरिअन तरुणीशी( एरिका कार) अजय देवगण ची जवळीक वाढते यातुनच पुढे त्यांना कन्यारत्न प्राप्त होते.हे आपत्य नको असल्याने एरिका मायदेशी परतते.अजय देवगण मग तिला कसे वाढवतो हे अतिशय रटाळ रित्या दाखवण्यात आले आहे,पुढे याच मुलीच्या ( अॅबिगेल एम्स) हट्टासाठी तो बल्गेरियात कसा जातो,तेथिल मानवी तस्करीच्या जाळ्यात तो कसा अडकतो? त्यातुन सुटतो का ? हे अतिशय ओढुन ताणुन दाखवण्यात आले आहे.
              मुळात दोन ओळींची असणारी कथा ओढुन-ताणुन १७२मि. करण्यात आली आहे. दर दहा -पंधरा मिनीटांनी रुळावरुन घसरणार्या कथेला रुळावर आणण्याचे काम बॅकग्राउंड म्युझिक करते.अॅक्शन हिरो म्हणुन वाकबगार असणारा अजय देवगण स्वत:च्या भुमिकेला न्याय दिलेला आहे,पण त्याला स्वत:ला भव्यदिव्य दाखवताना चित्रपट स्वकेंद्री झाल्याचे जाणवते म्हणुनच दिग्दर्शनाचे शिवधनुष्य त्याने दुसर्या कोणाकडे तरी द्यावयास हवे होते असे जाणवते.
                 बालकलाकार अॅबिगेल एम्स हीने अजय देवगणच्या मुलीची व्यक्तीरेखा स्वत:च्या दमावर पेलली आहे पण सुमार कथानक अन खराब ऐडिटींग (ऐडिटींग नाहीच केले) यामुळे त्या चिमुकलीचे प्रयत्नही तोकडे पडतात.अॅक्शन सीन मध्ये गाड्यांची उडवाउडवी करताना अजय देवगणला रोहीत शेट्टी होण्याचा मोह दिसतो.सबकुछ अजय देवगण,बघुन धापा टाकत शेवटाकडे येताना प्रेषक अॅक्शन नंतर ईमोशन्स मुळे जरा भावुक होतात पण अयोग्य क्लायमॅक्समुळे तिथेही त्याच्या पदरी निराशाच पडते.
                  पण ज्यांना बल्गेरिया अन हिमालयातील सौंदर्याची सैर या दिवाळीत करावयाची आहे त्यांच्यासाठी हा चित्रपट उत्तम आहे.बाकी अनेक प्रश्न अनुत्तरितच रहातात जसे की अॅबिगेल एम्स कोणाकडे रहाते? एरिका चे पुढे काय होते? हॅकर (वीर दास)चे पुढे काय होते? अन चित्रपट संपतो (संपवला असावा).एक चांगला शेवट करता आला असता पण एकंदरीतच या दिवाळीत चांगल्या चित्रपटांच्या अभावामुळे,सुट्टीचा मौसम, (देशप्रेम) यामुळे चित्रपट ठीकठाक गल्ला गोळा करेल अशी आशा करुयात.

चित्रपट का पाहु नये ?

  • सुमार कथानक
  • ओढुन -ताणुन घेतलेले सिन्स
  • स्वकेंद्री
  • हेतुविरहीत चित्रपटाची वाढवलेली लांबी
  • चघळुन चघळुन चोथा केलेल्या मानवी तस्करीची कथा

चित्रपट का पहावा ?

  • बाप-लेकी च्या नात्यातील भावनीकता
  • बॅकग्राउंड स्कोर,गाणी
  • अजय देवगण,बालकलाकार अॅबिगेल एम्स ,गिरिष कर्नाड यांचा अभिनय
  • निसर्गसौंदर्य
  • सामाजिक विषय हाताळणी

दिग्दर्शन - अजय देवगण
कलाकार- अजय देवगण,एरिका कार,साएशा सेहगल,अॅबिगेल एम्स,वीर दास




Thursday, 5 January 2017

माणसां,माणसां कधी रे होशील माणुस ?

रानडे च्या शेजारील खाउ गल्लीत, मित्रांसोबत मस्त वाफाळलेला,गरमा-गरम चहा मारत गप्पा चालु असताना,एकाने कोथरुड येथील महात्मा सोसायटी मध्ये महिलेला मारहाण झाली असे सांगितले.माझे कान जरा अधिकच टवकारले कारण, ही बातमी पत्रकारितेमधील ‘ह्युमन इंटरेस्ट’ या प्रकारात मोडत होती (कदाचित मी ही महात्मा सोसायटीत रहात असल्याने). गप्पा पुढे सरकल्या पण माझी गाडी मात्र तिथेच अडकली.डोक्यातील विचारांनी आता हातातील वाफाळलेल्या चहावर मात केली होती.
         अरुणा शानबाग,मथुरा केस,अंजना मिस्रा केस,निर्भया मार्गे कोपर्डी अन आता चक्क आमच्या कोथरुड मध्येच? मन सुन्न झाले.उत्क्रांतीचा माकडापासुन माणुस असा सुरु झालेला प्रवास आता परत उलट्या दिशेने होउ लागला आहे.कोथरुड मधील घटना तर सो काॅल्ड ‘सुशिक्षित’ व्यक्ती कडुन केलेली आहे.मुळातच आपण सुशिक्षित झालो म्हणजे नक्की काय झालो? १ किंवा २ प्रमाणपत्र मिळाले की, खरेच होतो का ओ आपण सुशिक्षित? अशी १ किंवा २ प्रमाणपत्रे मिळाली म्हणजे,समाजात कसेही स्वैराचाराने फिरायचे लायसन्स मिळाल्यासारखे वाटणे हेच मुळी आमच्या बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण आहे.’सुशिक्षित’ आणि ‘असुशिक्षित’ याच्यातील भेद दर्शवणारी रेषा आता पुसट होत आहे आणि म्हणुनच ‘सुशिक्षित’ या शब्दाची व्याख्या बदलण्याची गरज आली आहे.
          कुत्र्याचा उपद्रव होउ नये म्हणुन त्या व्यक्तीने महिलेला मारहाण केली,या घटनेे मागे तात्कालीन कारण जरी कुत्रा हा प्राणी असला तरी,त्याची पाळेमुळे समाजातील पुरुषसत्ताक पद्धत,शिक्षणपद्धत,सत्तेतुन आलेला माज,श्रीमंती,व्यवस्थेचे अपयश अशा अनेक पातळ्यांवर आपणास पहावयास मिळतील. उचललेला हात असो वा बलात्कारी मनोवृत्ती ही काही क्षणीक विचारांतुन आलेली नसते तर, त्याच्या मागे एक दिर्घ,वारंवार केलेला विचारप्रवाह असतो की ज्याला ईंग्रजीत ‘थाॅट प्रोसेस’ असे म्हटले जाते.वरिल प्रश्नाचा उहापोह करताना आपणास याच ‘थाॅट प्रोसेस’ चा अभ्यास करावा लागेल.


           सत्तेतुन आलेला माज यासाठी की, त्या व्यक्तीची पत्नी ही शासकीय अधिकारी वर्ग १ आहे.तिच्या पदाचा असा गैरवापर करुन अंगी भिनलेल्या माजुरडेपणातुनच हे कृत्य घडले.आपल्या श्रीमंतीने व्यवस्थेला वाकवण्याची सवय आणि त्यामुळेच अशा लोकांना सिस्टिम ची भितीच राहिली नाही अन मग यातुनच असे गुन्हेगारीवृत्तीचे क्रृत्य करण्यास हे धजावत नाहीत.
            एकवेळ जरी आपण असे मानले की, या प्रकरणामध्ये त्या बाईची ही चुक असेल पण म्हणुन त्यांच्यावर हात उचलणार? बुटाने त्यांना मारणार ? गुन्हा काय तर कुत्रा पाळला म्हणुन ? खरचं ईतक्या बोथट झाल्यात आपल्या जाणिवा? जिथे जाणिवा संपतात, बोथट होतात तिथे माणुस हा माणुस रहात नाही तो एक ‘जिंदा लाश’ बनुन रहातो.माणसाच्या माणुस पणाच्या लक्षणांत जाणिवेला खुप महत्त्व आहे,माणसाच्या जाणिवा-नेणिवा या व्यक्तिसापेक्ष आहेत,या जाणिवा-नेणिवेच्या कक्षा रुंदावण्यासाठी  शिक्षणाबरोबरच सामाजिक भान ही महत्त्वाचे ठरते.
             जाणिवा-नेणिवेच्या या द्वैतामधुन भानावर आलो.बघतो तर, हातातील वाफाळलेला,गरमागरम चहा एव्हाना थंड झाला होता.मित्रांनीही कलटी मारली होती.परत एक नविन,गरमागरम,पहिल्या धारेचा चहा मारुन मग मी ही रानडेची वाट धरली माझ्या जाणिवेच्या कक्षा रुंदावण्यासाठी,स्वत:ला नेणिवेच्या पातळीवर सिद्ध करण्यासाठी.
          By -
     s.Suresh
(shrinivas Suresh)

पैशाचा प्रवास ...छापाई पासुन ते सर्वसामान्यांपर्यत

पैशाचा प्रवास ...छापाई पासुन ते सर्वसामान्यांपर्यत




     केंद्रसरकारने केलेल्या नोटा बंदिमुळे ‘नोटा’ हा विषय सर्वांच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.नोटा कधी,कुठे,कशा,केव्हा,कोण छापल्या जातात? नोटा छापण्यामागचे सरकारचे धोरण? असे अनेक प्रश्न सर्वसामान्य वाचकाला पडत आहेत.नोटा छापण्यामागे केंद्र सरकार,रिझर्व बैंक आॅफ इंडिया,सिक्युरिटी प्रिंटींग अॅण्ड मिंटींग काॅरपोरेशन आॅफ इंडिया लिमीटेड यांची अतिशय महत्त्वाची भुमिका असते.
    नविन अर्थिक वर्ष सुरु होण्याच्या आधी भारतीय रिझर्व बैंक विकास दर आणि होणारे  ‘ई- पेमेंन्ट’ व्यवहारांचा विचार करुन गरज लागणार्या नोटांची आकडेवारी केंद्र सरकारशी विचारविनीमय करुन ठरवण्यात येते.नोटांसाठी लागणार्या उच्च सुरक्षित कागदाची निर्मिती,पुरवठा,रचना ही ‘करन्सी पेपर मिल’ म्हैसर आणि होशंगाबाद येथुन केली जाते.दौन्ही पेपर मिल ’करन्सी पेपर मिल’ म्हैसुर आणि होशंगाबाद यांची एकत्र वार्षिक कागदनिर्मिती क्षमता ही जवळपास अठरा हजार मेट्रिक टन एवढी आहे,गरज पडल्यास नोटांसाठी लागणार्या कागदाची भारत आयत देखिल करतो.
     म्हैसुर आणि होशंगाबाद येथे नोटांसाठी कागद तयार झाला की,तेथेच नोटांच्या सुरक्षिततेसाठी असणारी काही खास वैशिष्ठ्ये जसे की,’मल्टिटोनल’,थ्री डायमेन्शल वाटरमार्क’,’मायक्रो लिट्टेरिंग’,आणि ‘सिक्युरिटी थ्रेड’ नोटेच्या कागदावर मुद्रित करण्यात येतात.अशा रितीने म्हैसुर आणि होशंगाबाद येथेच नोटांचा कागद पुढील छापाईसाठी तयार होतो.
     म्हैसुर आणि होशंगाबाद येथे तयार झालेला कागद पुढील छापाईसाठी म्हैसुर,सालबोनी,देवास,नाशिक अशा चार वेगवेगळ्या ठिकाणी पाठवला जातो जेथे आणखी काही सुरक्षिततेसाठी असणारी वैशिष्ठ्ये जसे की,’आॅप्टिकली व्हेरिअबल इंक’,’रिफ्लेक्टिंग कलर्स’,मुद्रित करण्यात येतात.युरोपमध्ये नोटांच्या डिझाईन अंतिम करण्यास एक वर्ष लागते पण भारतात सध्या चलनात आणलेल्या पाचशे अन हजार च्या नोटांच्या डिझाईनला सहा महिन्यात तयार झाल्यात.यानंतर नोटांच्या छापाईला खरी सुरवात होते.नोटा या ‘शीट’ मध्ये छापल्या जातात.एका शीट वर आताच्या चलनातील दोन हजाराच्या चाळिस नोटा बसतात.छापाईनंतर नोटांचे ‘टेलिस्कोपिक नंबरिंग अॅण्ड कटिंग’ केले जाते.एका पाकिटात अशा शंभर नोटा असतात आणि अशा दहा पाकिटांचे मिळुन एक बंडल तयार होते.
    या छापलेल्या नोटा आता वितरणासाठी तयार असतात.रिझर्व बैंकेचे भारतभर असणार्या एकोणीस आॅफिस मधुन या वितरित होतात.ज्याठिकाणी रिझर्व बैंकेचे आॅफिस नाहीत तेथे या नोटा ‘करंन्सी चेस्ट’ द्वारे वितरीत करण्यात येतात.भारतात साधारणपणे चार हजार  ‘करंन्सी चेस्ट’ आहेत ज्यांना संबंधित राज्य सरकार,पोलिस यांद्वारे सुरक्षा देण्यात येते.’करंन्सी चेस्ट’ मधुन होणारे रोजचे वितरण आणि साठा यांची नोंद रिझर्व बैंक ठेवत असते.रेल्वे वॅगन,ट्रक,यांद्वारे नोटा पोलिसांच्या सुरक्षतेमध्ये वितरीत केल्या जातात.अतिदुर्गम प्रदेश जसे कि जम्मु आणि काश्मिर,उत्तर-पुर्वीय राज्ये येथे हॅलिकाॅप्टर,विमान यांद्वारे नोटा वितरित केल्या जातात.’करंन्सी चेस्ट’ मध्ये असणार्या नोटा या फक्त कागद असतात पण त्या जेव्हा बैकेत येतात तेव्हा त्या चलनी नोटा ठरतात.या चलनी नोटा छापताना त्याला तितक्याच प्रमाणाचा ‘कॅश’,’सिक्युरिटिज’,गव्हरमेंट बाॅन्ड याचा पाठिंबा द्यावा लागतो.
     यानंतर या नोटा बैंक,एटिएमयेथे पोचवण्याची सर्वात मोठी कामगिरी असते.भारतातील २.२लाख एटीएम साठी ७ नोंदणीकृत ‘कॅश लोजिस्टिक फर्म’ च्या ८,८०० ‘कॅश व्हॅन’,कार्यरत आहेत.नविन नोटा मार्केट मध्ये आल्यामुळे एटीएम मध्ये काही तांत्रिक सुधारणा करावी लागत आहेत.दररोज साधारण पणे १३,००० एटीएम अशा वेगाने एटीएम मध्ये तांत्रिक सुधारणा करत असल्याचे लाॅजिस्टिक फर्म कडुन सांगण्यात आले आहे.
      एका एटीएम मध्ये चार ‘कंटेनर’ (कसेट्स)असतात ज्यात प्रत्येकी २५००नोटा भरता येतात,प्रत्येक कंटेनर मध्ये एकाच ‘डिनोमिनेशन’ च्या नोटा भरता येतात.त्यामुळे एका एटीएम ची क्षमता ही १०,००० नोटा एवढीच असते.पाचशे आणि हजार च्या नोटा बंदि मुळे सध्या शंभर च्या नोटांनी २ कसेट्स भरण्यात येत आहे.त्यामुळ एटीएम मध्ये ५ लाख एवढीच रक्कम असते जी की काही तासातच संपते.नविन २००० च्या नोटेनुसार एटीएम मध्ये तांत्रिक सुधारणा केल्यास एटीएम ची क्षमता ६०लाख एवढी होईल ,कि जी साधारणपणे ३००० ग्राहकांना पुरेल.
      नव्या नोटांप्रमाणे एका एटीएम मध्ये तांत्रिक सुधारणा करण्यासाठी साधारणपणे २०मिनीटे एवढा वेळ लागतो.१७नोव्हेबर पर्यत जवळपास २०,००० एटीएम मध्ये तांत्रिक सुधारणा करण्यात आली आहे,सर्व एटीएम मध्ये तांत्रिक सुधारणा होण्यासाठी अजुन २०-२२ दिवस लागतील.
        आकडेवारी नुसार,चलनातील २३०० करोड नोटांना तेवढ्याच नविन नोटा उपलब्ध करुन देण्यास सहा महिन्यांचा कालावधी लागु शकतो.यासंदर्भात माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम म्हणतात,”सर्व नोटा छापणार्या प्रेस ची मर्यादा ही ३०० करोड प्रति महिना एवढी आहे,जर तुम्ही कमी ‘डिनोमिनेशच्या’ (१००,५००रु.) नोटा छापल्यास अजुन पाच पट जास्त वेळ लागेल.सध्या नकली चलनांचे मुल्य हे ४०० करोड रु. आहे कि जे एकुण वितरणाच्या ०.०२८% एवढेच होते.रिझर्व बैंके चे माजी गव्हर्नर के.सी.चक्रवर्ती म्हणतात ”जुन्या नोटांना पुर्णपणे बदलुन नविन नोटा येण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागेल”.
(Published in Loksatta)