(Published in Loksatta)
Thursday, 5 January 2017
पैशाचा प्रवास ...छापाई पासुन ते सर्वसामान्यांपर्यत
(Published in Loksatta)
Thursday, 11 August 2016
शोधल की सापडतच.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
राज ठाकरे मातोश्रीत....
.
.
.
खरा पोकेमॉन बारामतीत लपला असल्याचे मातोश्रीवरुन स्पष्ट ....”
Sunday, 3 July 2016
यांना "स्तन" म्हणतात स्तन...
“तुझ्या आईला आणि बहिणीला पण आहेत असे सेम”...
जरूर वाचा आणि विचार करा,
समाजात आपलीही आई-बहीण वावरत असते याचे भान ठेऊन वागत जा
किळसवाण्या कित्येक नजरा....
“अरे बघ ना....! टमाटर आहेत”
ऐन मिसरूड फुटलेल्या जेमतेम विशीतल्या पोरांच्या घोळक्यातुन हे वाक्य आल होत....
ठिकाण पी.एम.टी बस,
आताच २६–२७ वर्षाची,खांद्याला पत्रकारीता पद्धतीच दप्तर अडकवलेली उंच,गोऱ्या रंगाची आणि धिप्पाड बांध्याची मुलगी घाई घाईतच स्वतःला आणि स्वतःच्या ओढनीला सावरत पी.एम.टी बसच्या दरवाज्यातून आत बसमध्ये आली होती पण गाडीतल्या गर्दीमुळे ती मधेच घुटमळली असावी,मात्र तिच्याकडे पाहून उद्गारले गेलेल्या या वाक्यानंतर त्या घोळक्यातल एक डुकरी खिल्लड हसू संपूर्ण बसला ऐकायला भेटल.
बाकीच्यांना कदाचित काय झाल तेही कळाल नसेल मात्र सगळ्यांचे कान जरूर त्या उन्मदाकडे टवकारले गेले होते,
कंडक्टर काकांकडून तिकीट घेतल्यावर ती मुलगी क्षणार्धात त्या घोळक्याकडे वळाली...
आता पुढे काहीतरी वेगळ विपरीत होणार याची कुणकुण त्यातल्या प्रत्येकालाही लागली असेल कदाचित......
“का रे ? कुठे टमाटर दिसले तुला ? ”
तिने त्या घोळक्यातल्या डुकराला बरोबर हेरल होत आणि म्हणून तिने त्यालाच बरोबर विचारल.....
“जिथे दिसायला पाहीजे होते तिथेच दिसले ” त्याच्याकडून मुजोर प्रतिउत्तर आल,यानंतर त्या नालायकाची वागण्याची परीसीमा तिच्या पण लक्षात आली.
“अरे बाळा टमाटर नाहीत हे.....
तुझा गैरसमज झाला...
त्यांना “स्तन” म्हणतात....
“तुझ्या आईला आणि बहिणीला पण आहेत असे सेम”...हां.. कदाचित तू घरी ते तेवढे लक्ष देऊन पहिले नसशील.
जेव्हा तू लहान असशील ना....तेव्हा तर तुझ्या आईने काळजीने यातूनच तुला कित्येकदा दुध पाजून तुझी भूक भागवली असेल....
आणि काही नाही रे मांसल असतात....
तुझ्या हातापायांसारखे,
घरी गेल्यावर आईला किंवा बहिणीला विचार
सांगतील त्या,आणि हो आणि टमाटर नको म्हणूस नाहीतर त्यांना समजणार नाही....
“स्तन” म्हण....
स्त्रीयांना निसर्गाने दिलेली दैवी देणगी आहे ती,तुला नाही समजणार ते,कारण तुझ्यावर संस्कार करायला वेळच नसेल मिळाला तुझ्या घरच्यांना नाहीतर असा घाणेरडेपणा तुझ्या जिभेवर आलाच नसता.
त्याच्या अंगाला स्पर्शही न करता,तिने त्याला मारलेल्या त्या चपाराकीचा आवाज आता पी.एम.टी. बसच्या कानाकोपऱ्यात पोहचला होता,तिच्या डोळ्यातला निखारा आणि वागण्यातला आक्रमकपणा पाहून आणि काही वेगळ घडायच्या आधीच ४५-५० वर्ष्यांच्या एक मावशी तिला शांत करायला पुढे झाल्या, “शांत हो पोरी त्याला आता त्याची चूक उमगली असेल,तू नको आणि त्रास करून घेउस” हे सगळ समजावताना पण मावशी तिच्यापासून हातभर अंतर ठेउनच बोलतच होत्या....
“ काय शांत होऊ ओ काकू ?....किळस वाटतेय या लोकांची....२० वर्षांच नवीन मिशी फुटलेलं पोरग असू द्यात किंवा माझ्या वडिलांच्या वयाचे काका असुदेत,
तरी संपूर्ण अंगभर कपडे घातलेले असताना पण जेव्हा समोरचा कुणी मी त्याच्यासमोर नग्न उभी आहे या नजरेने पाहतो ना....तेव्हा मेल्याहून मरून जायला होत ओ.....
“रोज रोज तेच....तीच वासानाधीन नजर...का रे ? का सहन करायचं आम्ही ते रोज ? घरून दमून थकून काम करून यायचं आणि प्रवासात प्रत्येक क्षणी ओढणी आणि पदर सावरायचा......का ? तर या पिसाळलेल्या लोकांच्या नजरा चुकवायला,
हे घरी आपल्या आई बहिणींकडे पण याच नजरेने पाहत असतील का ओ ? या तिच्या प्रश्नार्थक वाक्यानंतर क्षणार्धात बसमधल्या सर्व पुरषी माना आपापल्या पायांच्या अंगठ्याकड़े झुकल्या....”
तिच्या रागाचा पारा चढलेलाच होता आणि तेवढ्यात तिच्याच वयाची एक मुलगी आपल्या जागेवरून उठली,
७-८ पावल चालून आता ती त्या मुलांच्या घोळक्याच्या आणि त्या मुलीच्या मधोमध येउन उभी राहिली.
पुढच्याच क्षणी तिने त्या मुलाच्या जोरात कानाखाली वाजवली,त्याच्या थोबाडीत मारल्यानंतर तिचा वाढलेला श्वास आणि राग सहज जाणवत होता.ती तशीच मागे झाली आणि परत आपल्या जागेवर जाउन बसली.एव्हाना चालू प्रकार बसच्या ड्राईव्हर काकांनापण समजला होता,म्हणून त्यांनीही बस बाजूला उभी केली,आणि मग ह्या प्रकाराने डोळ्यात पाणी आलेली ती मुलगी पुन्हा बोलायला लागली....
अगदी घराच्या बाहेर पहिल पाऊल टाकल्या टाकल्या,समोरच्या टपरीवर उभ्या असलेल्या टोळक्यातून काहीतरी अश्लील कमेंट पास होते त्याकडे दुर्लक्ष करायचं,
पुढे रिक्षासाठी उभ असताना जाणाऱ्या येणाऱ्या कित्येक वासनाधीन नजरा झेलायच्या,
नंतर बसमध्ये चढताना नको ते हपापलेले स्पर्श झेलायचे,
आणि त्यानंतर जिथे काम करायचं तिथेही हेच....
नालायक कुत्रे सगळे.....
कधीतरी समोरच्या बाईकडे,आई म्हणून ताई म्हणून पहा रे....
तिच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू तिच्या मनातली व्यथा सहज सांगत होते.पुढे काही वेळाने बस सुरु झाली निरव शांतता होती,तरी या शांततेत एक आक्रोश हंबरडा फोडत होता.
जेव्हा या विषयावर लिहिण्यासाठी काल मैत्रिणीसोबत चर्चा केली असता त्यांनी अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करतो म्हणुन सांगितले,म्हणुनच अशी मनोव्रुती फोफावु पहातेय, वेळीच जर प्रत्येकीने त्यांना आईच्या दुधाची आठवण करुन दिली तर अशा प्रव्रुत्तीना नक्कीच आळा बसेल.बहुतेक जणींने तर या विषयावर न लिहिण्याचा सल्ला ही दिला,आणि कित्येक जणीं तर ही पोस्ट लाईक करायला ही धजावणार नाहीत, वाचणार्या प्रत्येक मुला,मुलींना याचे जर गांभीर्य कळाले तर नक्की शेअर करा कारण नजरअंदाज करण्यासारखी ही गोष्ट नाहीय,अशा विषयांना वेळीच वाचा फोडली तरच आपण काही अंशी का होईना बदल घडवु शकु.
Wednesday, 28 October 2015
जीवनाचा प्रवास.
जीवनाचा प्रवास
जीवनाचा प्रवास एका अजब वळणावर आला आहे.
काल जे सोबत होते ते आज नाहित ,
उद्या जे सोबत देणार आहेत,ते हि आज नाहित
आज मात्र मी, एकटाच प्रवास करणार आहे.
जीवनाचा प्रवास एका अजब वळणावर आला आहे.
जे येतील त्यांना घेउन,
जे येणार नाहित त्यांच्याविना,
आज मात्र मी,एकटाच प्रवास करणार आहे.
जीवनाचा प्रवास एका अजब वळणावर आला आहे.
जीवलगांच्या आठवणी मनात साठवत,
कोसळलेल्या दु:खाचे हलाहल पचवत,
आज मात्र मी, एकटाच प्रवास करणार आहे.
जीवनाचा प्रवास एका अजब वळणावर आला आहे.
जन्मानंतर सुरु झालेला हा प्रवास ,
आता वेगाने शेवटाकडे जात आहे,
आज मात्र मी, एकटाच प्रवास करणार आहे..
©S.Suresh
Plz visit http://shrinivasdeshpande.blogspot.in
Monday, 26 October 2015
वेडा प्रेमी.......
वेडा प्रेमी.......
किती आठवण काढली,आता कुठे भेटलीस तु.
उशीरा का होईना पण ,शेवटी भेटलीस तु.
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,साथ मला देशील तु?
दुखाच्या सारीपाटावर ,सुखाचा डाव मांडशील तु?
या गरीबाची चटणी —भाकर गोड मानशील तु?
या वेड्या प्रेमी कडे एखादी तरी नजर टाकशील तु?
माहित नाहि ,माझ्या या प्रश्नांची उत्तरे काय असतील?
पण यावरच माझ्या उरलेल्याआयुष्याचे दिवस तर नसतील??
© S.Suresh.
Wednesday, 21 October 2015
माझे अस्तित्व
Wednesday, 8 July 2015
व्यापम ...देर आये , दुरुस्त आये
व्यापम ....देर आये ,दुरुस्त आये.
व्यावसायिक परिक्षा मंडल (व्यापम ),मध्य प्रदेश चा घोटाळा हा देशातील सर्वात मोठा घोटाळा ठरु पहातोय.वैद्यकिय ,अभियांत्रिकी च्या अभ्यासक्रमासाठी ची प्रवेश परिक्षेची जबाबदारी या मंडळावर होती ईथवर सर्व ठीक होते.परंतु ,राज्यशासनाचे प्रशासकीय अधिकारी नेमण्याची जबाबदारी हि व्यापम वर टाकुन भ्रष्टाचार्याना जणु चराउ कुरणच खुले करुन दिले.
आणि येथुनच घोटाळा बाहेर येउ लागला.परिक्षेला तोतया विद्यार्थी बसवणे ,लाच घेउन अधिकारी भरती करणे,पात्रता नसताना चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळवुन देणे असे 1ना अनेक प्रकार हळु हळु बाहेर येउ लागले.मध्य प्रदेशातील काहि व्हिसल ब्लोअर नी हळु हळु या प्रकरणातील एक ,एक धागे -दोरे बाहेर आणले.तर आता त्याचाच जीव धोक्यात येउ पहातोय कारण यात आतापर्यत 1नव्हे ,2नव्हे तर तब्बल 45हुन जास्त जणाना आपला जीव गमवावा लागला आहे.मग तो राज्यपालांचा मुलगा असेना नाहितर वैद्यकिय महाविद्यालयाचे डिन ,पोलिस ,पत्रकार ,विद्यार्थी कोणीहि यातुन सुटु शकले नाहित.यातील साधारणपणे 15जाणांचा म्रुत्यु हा संशयास्पद आहे ,
यात आतापर्यत 1800हुन अधिक जणाना अटक करण्यात आली आहे.ईतके भयाण वास्तव समोर असताना राज्याचे ग्रुह मंत्री बाबुलाल ,"जो जन्माला येतो ,तो एकदा ना एकदा मरणारच "अशी वाचाळगिरी करताना दिसत आहेत.मरणारी प्रत्येक व्यक्ती जरी व्यापम शी सम्बधित नसली तरीव्यापम शी सम्बधित असणार्याचे असे संशयास्पद होणारे म्रुत्यु ची वाढणारी आकडेवारी दुर्लक्षित करुन चालणार नाहि.
सलग 3दा बहुमताच्या जोरावर मध्य प्रदेश मध्ये भाजपा सरकार आहे.भाजपा सरकारचे काम SIT (Special Investigation Team )नेमुन झाले का? SIT नेमली कि त्याची जबाबदारी सम्पते का ?कारण हि SIT शेवटि सरकारच्या खालीच काम करणार आहे.पारदर्शी कारभारची ग्वाहि देणारे भाजप सरकार चा CBI चौकशीस का विरोध होता?पण जनमताच्या रेट्यापुढे त्यानी माघार घेउन त्यानी CBI चौकशी ची मागणी केली.भाजपाला या उशीरा सुचलेल्या शहाणपणाचे 'देर आये ,दुरुस्त आये 'म्हणुन स्वागत करावे लागेल.
एकिकडे जगात भारतातील वैद्यकिय ,अभियांत्रिकि च्या विद्यार्थाना मागणी वाढत असतानाच दुसरीकडे व्यापम सारख्या प्रकरणामुळे भविश्यात आपल्या विद्यार्थीच्या गुणवत्तेबाबत शंका घेतली जाउ शकते.त्यात हुशार ,गुणवान विद्यार्थीची अवस्था 'गव्हा बरोबर किडे रगडल्या प्रमाणे होइल ' . 'स्किल इंडिया 'अशी घोषणा देणारे मोदि विद्यार्थीच्या स्किल शी सम्बधित प्रकरणात मात्र "मौनि बाबा " झालेत.
