Sunday, 3 July 2016

यांना "स्तन" म्हणतात स्तन...

यांना “स्तन” म्हणतात स्तन...
“तुझ्या आईला आणि बहिणीला पण आहेत असे सेम”...
जरूर वाचा आणि विचार करा,
समाजात आपलीही आई-बहीण वावरत असते याचे भान ठेऊन वागत जा
किळसवाण्या कित्येक नजरा....
“अरे बघ ना....! टमाटर आहेत”
ऐन मिसरूड फुटलेल्या जेमतेम विशीतल्या पोरांच्या घोळक्यातुन हे वाक्य आल होत....
ठिकाण पी.एम.टी बस,
आताच २६–२७ वर्षाची,खांद्याला पत्रकारीता पद्धतीच दप्तर अडकवलेली उंच,गोऱ्या रंगाची आणि धिप्पाड बांध्याची मुलगी घाई घाईतच स्वतःला आणि स्वतःच्या ओढनीला सावरत पी.एम.टी बसच्या दरवाज्यातून आत बसमध्ये आली होती पण गाडीतल्या गर्दीमुळे ती मधेच घुटमळली असावी,मात्र तिच्याकडे पाहून उद्गारले गेलेल्या या वाक्यानंतर त्या घोळक्यातल एक डुकरी खिल्लड हसू संपूर्ण बसला ऐकायला भेटल.
बाकीच्यांना कदाचित काय झाल तेही कळाल नसेल मात्र सगळ्यांचे कान जरूर त्या उन्मदाकडे टवकारले गेले होते,
कंडक्टर काकांकडून तिकीट घेतल्यावर ती मुलगी क्षणार्धात त्या घोळक्याकडे वळाली...
आता पुढे काहीतरी वेगळ विपरीत होणार याची कुणकुण त्यातल्या प्रत्येकालाही लागली असेल कदाचित......
“का रे ? कुठे टमाटर दिसले तुला ? ”
तिने त्या घोळक्यातल्या डुकराला बरोबर हेरल होत आणि म्हणून तिने त्यालाच बरोबर विचारल.....
“जिथे दिसायला पाहीजे होते तिथेच दिसले ” त्याच्याकडून मुजोर प्रतिउत्तर आल,यानंतर त्या नालायकाची वागण्याची परीसीमा तिच्या पण लक्षात आली.
“अरे बाळा टमाटर नाहीत हे.....
तुझा गैरसमज झाला...
त्यांना “स्तन” म्हणतात....
“तुझ्या आईला आणि बहिणीला पण आहेत असे सेम”...हां.. कदाचित तू घरी ते तेवढे लक्ष देऊन पहिले नसशील.
जेव्हा तू लहान असशील ना....तेव्हा तर तुझ्या आईने काळजीने यातूनच तुला कित्येकदा दुध पाजून तुझी भूक भागवली असेल....
आणि काही नाही रे मांसल असतात....
तुझ्या हातापायांसारखे,
घरी गेल्यावर आईला किंवा बहिणीला विचार
सांगतील त्या,आणि हो आणि टमाटर नको म्हणूस नाहीतर त्यांना समजणार नाही....
“स्तन” म्हण....
स्त्रीयांना निसर्गाने दिलेली दैवी देणगी आहे ती,तुला नाही समजणार ते,कारण तुझ्यावर संस्कार करायला वेळच नसेल मिळाला तुझ्या घरच्यांना नाहीतर असा घाणेरडेपणा तुझ्या जिभेवर आलाच नसता.
त्याच्या अंगाला स्पर्शही न करता,तिने त्याला मारलेल्या त्या चपाराकीचा आवाज आता पी.एम.टी. बसच्या कानाकोपऱ्यात पोहचला होता,तिच्या डोळ्यातला निखारा आणि वागण्यातला आक्रमकपणा पाहून आणि काही वेगळ घडायच्या आधीच ४५-५० वर्ष्यांच्या एक मावशी तिला शांत करायला पुढे झाल्या, “शांत हो पोरी त्याला आता त्याची चूक उमगली असेल,तू नको आणि त्रास करून घेउस” हे सगळ समजावताना पण मावशी तिच्यापासून हातभर अंतर ठेउनच बोलतच होत्या....
“ काय शांत होऊ ओ काकू ?....किळस वाटतेय या लोकांची....२० वर्षांच नवीन मिशी फुटलेलं पोरग असू द्यात किंवा माझ्या वडिलांच्या वयाचे काका असुदेत,
तरी संपूर्ण अंगभर कपडे घातलेले असताना पण जेव्हा समोरचा कुणी मी त्याच्यासमोर नग्न उभी आहे या नजरेने पाहतो ना....तेव्हा मेल्याहून मरून जायला होत ओ.....
“रोज रोज तेच....तीच वासानाधीन नजर...का रे ? का सहन करायचं आम्ही ते रोज ? घरून दमून थकून काम करून यायचं आणि प्रवासात प्रत्येक क्षणी ओढणी आणि पदर सावरायचा......का ? तर या पिसाळलेल्या लोकांच्या नजरा चुकवायला,
हे घरी आपल्या आई बहिणींकडे पण याच नजरेने पाहत असतील का ओ ? या तिच्या प्रश्नार्थक वाक्यानंतर क्षणार्धात बसमधल्या सर्व पुरषी माना आपापल्या पायांच्या अंगठ्याकड़े झुकल्या....”
तिच्या रागाचा पारा चढलेलाच होता आणि तेवढ्यात तिच्याच वयाची एक मुलगी आपल्या जागेवरून उठली,
७-८ पावल चालून आता ती त्या मुलांच्या घोळक्याच्या आणि त्या मुलीच्या मधोमध येउन उभी राहिली.
पुढच्याच क्षणी तिने त्या मुलाच्या जोरात कानाखाली वाजवली,त्याच्या थोबाडीत मारल्यानंतर तिचा वाढलेला श्वास आणि राग सहज जाणवत होता.ती तशीच मागे झाली आणि परत आपल्या जागेवर जाउन बसली.एव्हाना चालू प्रकार बसच्या ड्राईव्हर काकांनापण समजला होता,म्हणून त्यांनीही बस बाजूला उभी केली,आणि मग ह्या प्रकाराने डोळ्यात पाणी आलेली ती मुलगी पुन्हा बोलायला लागली....
अगदी घराच्या बाहेर पहिल पाऊल टाकल्या टाकल्या,समोरच्या टपरीवर उभ्या असलेल्या टोळक्यातून काहीतरी अश्लील कमेंट पास होते त्याकडे दुर्लक्ष करायचं,
पुढे रिक्षासाठी उभ असताना जाणाऱ्या येणाऱ्या कित्येक वासनाधीन नजरा झेलायच्या,
नंतर बसमध्ये चढताना नको ते हपापलेले स्पर्श झेलायचे,
आणि त्यानंतर जिथे काम करायचं तिथेही हेच....
नालायक कुत्रे सगळे.....
कधीतरी समोरच्या बाईकडे,आई म्हणून ताई म्हणून पहा रे....
तिच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू तिच्या मनातली व्यथा सहज सांगत होते.पुढे काही वेळाने बस सुरु झाली निरव शांतता होती,तरी या शांततेत एक आक्रोश हंबरडा फोडत होता.
जेव्हा या विषयावर लिहिण्यासाठी काल मैत्रिणीसोबत चर्चा केली असता त्यांनी अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करतो म्हणुन सांगितले,म्हणुनच अशी मनोव्रुती फोफावु पहातेय, वेळीच जर प्रत्येकीने त्यांना आईच्या दुधाची आठवण करुन दिली तर अशा प्रव्रुत्तीना नक्कीच आळा बसेल.बहुतेक जणींने तर या विषयावर न लिहिण्याचा सल्ला ही दिला,आणि कित्येक जणीं तर ही पोस्ट लाईक करायला ही धजावणार नाहीत, वाचणार्या प्रत्येक मुला,मुलींना याचे जर गांभीर्य कळाले तर नक्की शेअर करा कारण नजरअंदाज करण्यासारखी ही गोष्ट नाहीय,अशा विषयांना वेळीच वाचा फोडली तरच आपण काही अंशी का होईना बदल घडवु शकु.
(Forwarded)

6 comments:

  1. Good Read Srinivas!!, mindset like this has to be eradicated by resisting wrong doings, it will surely not happen overnight but will evolve with true effort. And I am sure articles like these are a great support system to contribute towards this change..keep up your enthusiasm.

    ReplyDelete
  2. Well described... Really very effective words. Need to spread these words to contribute towards a huge change.

    ReplyDelete
  3. Realized broblem very good focus

    ReplyDelete
  4. Realized broblem very good focus

    ReplyDelete