Thursday, 11 August 2016

शोधल की सापडतच.

शोधल की सापडतच.


त्या दिवशी कामातुन जरासा फुरसद भेटली म्हणुन व्हाॅटसअप च्या जगात डोकावण्याचा मोह झाला,ग्रुप मधील मेसेजेस चेक करता-करता एका मेसेज वर नजर अडकली ,
“पोकिमन पकडण्याच्या नादात ..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
राज ठाकरे मातोश्रीत....
.
.
.

खरा पोकेमॉन बारामतीत लपला असल्याचे मातोश्रीवरुन स्पष्ट ....”

राज आणि उद्बव यांच्या भेटीवर,पोकेमाॅनद्वारे मिश्किलभाष्य करणारा मेसेज वाचुन झाला पण पोकेमाॅन काही माझ्या डोक्यातुन बाहेर पडता पडेना कारण आजकाल पेपर,टिवी,काॅलेजकट्टा,आॅफिस मधील चर्चेमध्ये आवडीने चघळला जाणारा विषय पोकेमाॅन ठरु पहातोय.काय,कसा आहेस ? ऐवजी किती पोकेमाॅन सापडले? असे प्रश्न ऐकमेकांना विचारले जात आहेत आणि म्हणुनच काय की या विषयावर राज्याच्या विधानपरिषदेत ही चर्चा घ्यावी लागली यावरुनच या विषयाचे गांभिर्य आपण लक्षात घ्यावयास हवे.
       ९०च्या दशकात पोकेमाॅन च्या प्रथम आव्रृत्ती ने मुलांच्या मनावर गारुड केले होते आता जपानी कंपनी नितांदो यांनी विकसित केलेला ‘पोकेमॉन गो’  या लोकेशन बेस्ड ऑगमेंटेड रिअॅलिटी गेमनं सध्या जगभरात अनेकांना अक्षरश: ‘याड लावलय’.पोकेमाॅन गो गेम ची ही आयडिया २०१४च्या गुगल च्या ‘एप्रिल फुल’ जोक वरुन घेण्यात आली आहे .अधिकृतरित्या हा गेम सध्या फक्त अमेरिका,आॅस्ट्रेलिया,न्युझिलंड इ.देशांमध्येच उपलब्ध आहे,जरी हा गेम भारतात उपलब्ध नसला तरी पायरेटेड व्हर्जन वापरणार्याची संख्या वरचेवर वाढत आहे,जी चिंतेची बाब ठरत आहे कारण, पोकेमाॅन पकडण्यासाठी तरुणाई भान हरवुन गार्डन,रेल्वेमार्ग,समुद्रकाठ,हायवे वर अपघाताला निमंत्रण देत आहेत.कॅनडामध्ये तर पोकेमाॅन पकडण्याच्या नादात एकजण अमेरिकेत जाउन पोचला तर, तिकडे न्युझिलंड मध्ये १५० पोकेमाॅन पकडण्याचा चंग पुर्ण करण्यासाठी एका पठ्ठ्याने सरळ सरळ नोकरीचा राजीनामाच देउन टाकलाय. आपल्या भारतात ही काही वेगळे चित्र नाहीय मुंबई मध्ये एक मुलगा पोकेमाॅन पकडता -पकडता चक्क महिला स्वच्छताग्रृहातच जाउन पोचला.या शारिरिक,मानसिक धोक्यांबरोबरच मोबाईल डाटा,लोकशन ई.महत्त्वपुर्ण माहिती असुरक्षित हाती पोचण्याचा धोका संभवतो कारण iOSप्रणालीवर ही गेम डाउनलोड करताना तुमचा डेटा वापरण्याची परवानगी मागितली जात नाही.
      पोकेमाॅन ने पहिल्या आठवड्यातच जवळपास ६५ दशलकक्ष दररोज वापरकर्त्याचा टप्पा ओलांडलाय तर ३% पेक्षा जास्त अमेरिकन याचा रोज वापर करत आहेत.याचा फटका फेसबुक,ट्विटर यांना तर बसलायच पण नितांदो कंपनीच्या शेअर चे भाव ५०% नी वाढलेत तरी अजुन पोकेमाॅन काही देशापुरताच मर्यादित आहे यावरुनच पोकेमाॅनरुपी त्सुनामीची आपल्याला कल्पना येते.
      मानसोपचारतज्ञाच्या मते हा गेम खेळताना मुलांच्या मेंदूतील अनेक अवयव जागृत करण्याची गरज असते. यात एकाग्रता, हालचाल, चपळता, अचूकता अशा अनेक क्रिया कराव्या लागतात. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भ्रमणध्वनीच्या स्क्रीनकडे पाहातच चालत जावे लागत असल्यामुळे खेळताना मुलांना आजूबाजूचे भान राहत नाही. यामुळे इतर संकटांनाही आमंत्रण देणारा हा खेळ ठरेल, त्याचबरोबर मैदानी खेळातील शारिरिक हलचालीच्या अभावाने स्थुलता ही वाढेल,म्हणुनच पोकोमॅन हा गेम न रहाता तो एक सामाजिक मुद्दा होतो जो जगातील सर्वात जास्त तरुणांची संख्या असणार्या देशाला आभासी जगात गुंतवु पहातोय.वास्तवातील लहान-लहान गोष्टीतुन मिळणार्या सुखाला डावलुन कल्पनेतील सुख मिळवण्यासाठीच तर ही शोधा,शोध नसेल ना?
      एकुणच काय तर,वास्तवातील सत्याला नाकारुन मानवी कल्पनाशक्तीचा जोरावर आभासी जीवनात स्वप्नाचे ईमले बांधणारी आजची ही तरुणाई यातच रमु पहात आहे,कारण या आभासी जीवनात नसतो झगडा भाकरीच्या चंद्रा साठीचा.

Sunday, 3 July 2016

यांना "स्तन" म्हणतात स्तन...

यांना “स्तन” म्हणतात स्तन...
“तुझ्या आईला आणि बहिणीला पण आहेत असे सेम”...
जरूर वाचा आणि विचार करा,
समाजात आपलीही आई-बहीण वावरत असते याचे भान ठेऊन वागत जा
किळसवाण्या कित्येक नजरा....
“अरे बघ ना....! टमाटर आहेत”
ऐन मिसरूड फुटलेल्या जेमतेम विशीतल्या पोरांच्या घोळक्यातुन हे वाक्य आल होत....
ठिकाण पी.एम.टी बस,
आताच २६–२७ वर्षाची,खांद्याला पत्रकारीता पद्धतीच दप्तर अडकवलेली उंच,गोऱ्या रंगाची आणि धिप्पाड बांध्याची मुलगी घाई घाईतच स्वतःला आणि स्वतःच्या ओढनीला सावरत पी.एम.टी बसच्या दरवाज्यातून आत बसमध्ये आली होती पण गाडीतल्या गर्दीमुळे ती मधेच घुटमळली असावी,मात्र तिच्याकडे पाहून उद्गारले गेलेल्या या वाक्यानंतर त्या घोळक्यातल एक डुकरी खिल्लड हसू संपूर्ण बसला ऐकायला भेटल.
बाकीच्यांना कदाचित काय झाल तेही कळाल नसेल मात्र सगळ्यांचे कान जरूर त्या उन्मदाकडे टवकारले गेले होते,
कंडक्टर काकांकडून तिकीट घेतल्यावर ती मुलगी क्षणार्धात त्या घोळक्याकडे वळाली...
आता पुढे काहीतरी वेगळ विपरीत होणार याची कुणकुण त्यातल्या प्रत्येकालाही लागली असेल कदाचित......
“का रे ? कुठे टमाटर दिसले तुला ? ”
तिने त्या घोळक्यातल्या डुकराला बरोबर हेरल होत आणि म्हणून तिने त्यालाच बरोबर विचारल.....
“जिथे दिसायला पाहीजे होते तिथेच दिसले ” त्याच्याकडून मुजोर प्रतिउत्तर आल,यानंतर त्या नालायकाची वागण्याची परीसीमा तिच्या पण लक्षात आली.
“अरे बाळा टमाटर नाहीत हे.....
तुझा गैरसमज झाला...
त्यांना “स्तन” म्हणतात....
“तुझ्या आईला आणि बहिणीला पण आहेत असे सेम”...हां.. कदाचित तू घरी ते तेवढे लक्ष देऊन पहिले नसशील.
जेव्हा तू लहान असशील ना....तेव्हा तर तुझ्या आईने काळजीने यातूनच तुला कित्येकदा दुध पाजून तुझी भूक भागवली असेल....
आणि काही नाही रे मांसल असतात....
तुझ्या हातापायांसारखे,
घरी गेल्यावर आईला किंवा बहिणीला विचार
सांगतील त्या,आणि हो आणि टमाटर नको म्हणूस नाहीतर त्यांना समजणार नाही....
“स्तन” म्हण....
स्त्रीयांना निसर्गाने दिलेली दैवी देणगी आहे ती,तुला नाही समजणार ते,कारण तुझ्यावर संस्कार करायला वेळच नसेल मिळाला तुझ्या घरच्यांना नाहीतर असा घाणेरडेपणा तुझ्या जिभेवर आलाच नसता.
त्याच्या अंगाला स्पर्शही न करता,तिने त्याला मारलेल्या त्या चपाराकीचा आवाज आता पी.एम.टी. बसच्या कानाकोपऱ्यात पोहचला होता,तिच्या डोळ्यातला निखारा आणि वागण्यातला आक्रमकपणा पाहून आणि काही वेगळ घडायच्या आधीच ४५-५० वर्ष्यांच्या एक मावशी तिला शांत करायला पुढे झाल्या, “शांत हो पोरी त्याला आता त्याची चूक उमगली असेल,तू नको आणि त्रास करून घेउस” हे सगळ समजावताना पण मावशी तिच्यापासून हातभर अंतर ठेउनच बोलतच होत्या....
“ काय शांत होऊ ओ काकू ?....किळस वाटतेय या लोकांची....२० वर्षांच नवीन मिशी फुटलेलं पोरग असू द्यात किंवा माझ्या वडिलांच्या वयाचे काका असुदेत,
तरी संपूर्ण अंगभर कपडे घातलेले असताना पण जेव्हा समोरचा कुणी मी त्याच्यासमोर नग्न उभी आहे या नजरेने पाहतो ना....तेव्हा मेल्याहून मरून जायला होत ओ.....
“रोज रोज तेच....तीच वासानाधीन नजर...का रे ? का सहन करायचं आम्ही ते रोज ? घरून दमून थकून काम करून यायचं आणि प्रवासात प्रत्येक क्षणी ओढणी आणि पदर सावरायचा......का ? तर या पिसाळलेल्या लोकांच्या नजरा चुकवायला,
हे घरी आपल्या आई बहिणींकडे पण याच नजरेने पाहत असतील का ओ ? या तिच्या प्रश्नार्थक वाक्यानंतर क्षणार्धात बसमधल्या सर्व पुरषी माना आपापल्या पायांच्या अंगठ्याकड़े झुकल्या....”
तिच्या रागाचा पारा चढलेलाच होता आणि तेवढ्यात तिच्याच वयाची एक मुलगी आपल्या जागेवरून उठली,
७-८ पावल चालून आता ती त्या मुलांच्या घोळक्याच्या आणि त्या मुलीच्या मधोमध येउन उभी राहिली.
पुढच्याच क्षणी तिने त्या मुलाच्या जोरात कानाखाली वाजवली,त्याच्या थोबाडीत मारल्यानंतर तिचा वाढलेला श्वास आणि राग सहज जाणवत होता.ती तशीच मागे झाली आणि परत आपल्या जागेवर जाउन बसली.एव्हाना चालू प्रकार बसच्या ड्राईव्हर काकांनापण समजला होता,म्हणून त्यांनीही बस बाजूला उभी केली,आणि मग ह्या प्रकाराने डोळ्यात पाणी आलेली ती मुलगी पुन्हा बोलायला लागली....
अगदी घराच्या बाहेर पहिल पाऊल टाकल्या टाकल्या,समोरच्या टपरीवर उभ्या असलेल्या टोळक्यातून काहीतरी अश्लील कमेंट पास होते त्याकडे दुर्लक्ष करायचं,
पुढे रिक्षासाठी उभ असताना जाणाऱ्या येणाऱ्या कित्येक वासनाधीन नजरा झेलायच्या,
नंतर बसमध्ये चढताना नको ते हपापलेले स्पर्श झेलायचे,
आणि त्यानंतर जिथे काम करायचं तिथेही हेच....
नालायक कुत्रे सगळे.....
कधीतरी समोरच्या बाईकडे,आई म्हणून ताई म्हणून पहा रे....
तिच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू तिच्या मनातली व्यथा सहज सांगत होते.पुढे काही वेळाने बस सुरु झाली निरव शांतता होती,तरी या शांततेत एक आक्रोश हंबरडा फोडत होता.
जेव्हा या विषयावर लिहिण्यासाठी काल मैत्रिणीसोबत चर्चा केली असता त्यांनी अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करतो म्हणुन सांगितले,म्हणुनच अशी मनोव्रुती फोफावु पहातेय, वेळीच जर प्रत्येकीने त्यांना आईच्या दुधाची आठवण करुन दिली तर अशा प्रव्रुत्तीना नक्कीच आळा बसेल.बहुतेक जणींने तर या विषयावर न लिहिण्याचा सल्ला ही दिला,आणि कित्येक जणीं तर ही पोस्ट लाईक करायला ही धजावणार नाहीत, वाचणार्या प्रत्येक मुला,मुलींना याचे जर गांभीर्य कळाले तर नक्की शेअर करा कारण नजरअंदाज करण्यासारखी ही गोष्ट नाहीय,अशा विषयांना वेळीच वाचा फोडली तरच आपण काही अंशी का होईना बदल घडवु शकु.
(Forwarded)

Wednesday, 28 October 2015

जीवनाचा प्रवास.


                जीवनाचा प्रवास


जीवनाचा प्रवास एका अजब वळणावर आला आहे.
काल जे सोबत होते ते आज नाहित ,
उद्या जे सोबत देणार आहेत,ते हि आज नाहित
आज मात्र मी, एकटाच प्रवास करणार आहे.


जीवनाचा प्रवास एका अजब वळणावर आला आहे.
जे येतील त्यांना घेउन,
जे येणार नाहित त्यांच्याविना,
आज मात्र मी,एकटाच प्रवास करणार आहे.


जीवनाचा प्रवास एका अजब वळणावर आला आहे.
जीवलगांच्या आठवणी मनात साठवत,
कोसळलेल्या दु:खाचे हलाहल पचवत,
आज मात्र मी, एकटाच प्रवास करणार आहे.


जीवनाचा प्रवास एका अजब वळणावर आला आहे.
जन्मानंतर सुरु झालेला हा प्रवास ,
आता वेगाने शेवटाकडे जात आहे,
आज मात्र मी, एकटाच प्रवास करणार आहे..


©S.Suresh
Plz visit http://shrinivasdeshpande.blogspot.in

Monday, 26 October 2015

वेडा प्रेमी.......


                      वेडा प्रेमी.......

किती आठवण काढली,आता कुठे  भेटलीस तु.

उशीरा का होईना पण ,शेवटी भेटलीस तु.

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,साथ मला देशील तु?

दुखाच्या सारीपाटावर ,सुखाचा डाव मांडशील तु?

या गरीबाची चटणी —भाकर गोड मानशील तु?

या वेड्या प्रेमी कडे एखादी तरी नजर टाकशील तु?

माहित नाहि ,माझ्या या प्रश्नांची उत्तरे काय असतील?

पण यावरच माझ्या उरलेल्याआयुष्याचे दिवस तर नसतील??


                                                                 © S.Suresh.

Wednesday, 21 October 2015

माझे अस्तित्व

                         माझे अस्तित्व

माझे अस्तित्व नकारणार्यासाठी कदाचित मी संपलेला असेन,

सर्व काहि असुनहि मी फक्त त्यांच्यासाठीच संपलेला असेन.

संपलेल्याचे संपलेपण म्हणुनही मी कदाचित त्यांना बोचत असेन,

या बोचलेपणाच्या भांडवलावरच मी त्यांच्यासाठी अस्तित्वात असेन...

                                                                            © S.Suresh.

Wednesday, 8 July 2015

व्यापम ...देर आये , दुरुस्त आये

                                     व्यापम ....देर आये ,दुरुस्त आये.
       व्यावसायिक परिक्षा मंडल (व्यापम ),मध्य प्रदेश चा घोटाळा हा देशातील सर्वात मोठा घोटाळा ठरु पहातोय.वैद्यकिय ,अभियांत्रिकी च्या  अभ्यासक्रमासाठी ची प्रवेश परिक्षेची जबाबदारी या मंडळावर होती ईथवर सर्व ठीक होते.परंतु ,राज्यशासनाचे प्रशासकीय अधिकारी नेमण्याची जबाबदारी हि व्यापम वर टाकुन भ्रष्टाचार्याना जणु चराउ कुरणच खुले करुन दिले.
      आणि येथुनच घोटाळा बाहेर येउ लागला.परिक्षेला तोतया विद्यार्थी बसवणे ,लाच घेउन अधिकारी भरती करणे,पात्रता नसताना चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळवुन देणे  असे 1ना अनेक प्रकार हळु हळु बाहेर येउ लागले.मध्य प्रदेशातील काहि व्हिसल ब्लोअर नी हळु हळु या प्रकरणातील एक ,एक धागे -दोरे बाहेर आणले.तर आता त्याचाच जीव धोक्यात येउ पहातोय कारण यात आतापर्यत 1नव्हे ,2नव्हे तर तब्बल 45हुन जास्त जणाना आपला जीव गमवावा लागला आहे.मग तो राज्यपालांचा मुलगा असेना नाहितर वैद्यकिय महाविद्यालयाचे डिन ,पोलिस ,पत्रकार ,विद्यार्थी कोणीहि यातुन सुटु शकले नाहित.यातील साधारणपणे 15जाणांचा म्रुत्यु हा संशयास्पद आहे ,
       यात आतापर्यत 1800हुन अधिक जणाना अटक करण्यात आली आहे.ईतके भयाण वास्तव समोर असताना राज्याचे ग्रुह मंत्री बाबुलाल ,"जो जन्माला येतो ,तो एकदा ना एकदा मरणारच "अशी वाचाळगिरी करताना दिसत आहेत.मरणारी प्रत्येक व्यक्ती जरी व्यापम शी सम्बधित नसली तरीव्यापम शी सम्बधित असणार्याचे असे  संशयास्पद होणारे म्रुत्यु ची वाढणारी आकडेवारी दुर्लक्षित करुन चालणार नाहि.
        सलग 3दा बहुमताच्या जोरावर मध्य प्रदेश मध्ये भाजपा सरकार आहे.भाजपा सरकारचे काम SIT (Special Investigation  Team )नेमुन झाले का? SIT नेमली कि त्याची जबाबदारी सम्पते का ?कारण हि SIT शेवटि सरकारच्या खालीच काम करणार आहे.पारदर्शी कारभारची ग्वाहि देणारे भाजप सरकार चा CBI चौकशीस का विरोध होता?पण जनमताच्या रेट्यापुढे त्यानी माघार घेउन त्यानी CBI चौकशी ची मागणी केली.भाजपाला या उशीरा सुचलेल्या शहाणपणाचे 'देर आये ,दुरुस्त आये 'म्हणुन स्वागत करावे लागेल.
         एकिकडे जगात भारतातील वैद्यकिय ,अभियांत्रिकि च्या विद्यार्थाना मागणी वाढत असतानाच दुसरीकडे व्यापम सारख्या प्रकरणामुळे भविश्यात आपल्या विद्यार्थीच्या गुणवत्तेबाबत शंका घेतली जाउ शकते.त्यात हुशार ,गुणवान विद्यार्थीची अवस्था 'गव्हा बरोबर किडे रगडल्या प्रमाणे होइल ' . 'स्किल इंडिया 'अशी घोषणा देणारे मोदि विद्यार्थीच्या स्किल शी सम्बधित प्रकरणात मात्र  "मौनि बाबा " झालेत.

Sunday, 28 June 2015

परदे के पिछे क्या है ?

            परदे के पिछे क्या है  ?
       शुक्रवारी माझे काम संपवुन मी घरी परतण्याच्या बेतात बस थांब्या ला उभा होतो.  अचानक 'प्रिया' हि माझी  एक जुनी मैत्रिण मला हाक मारू लागली,मला काहिच समजेना कारण तिने चेहर्याला "स्कार्फ" बांधला होता .मी हि काहीश्या अनोळखी भावमुद्रेने तिला न्याहाळत होतो ,बहुतेक तिला समजले आणि स्कार्फ काढला,मगच मी तिला ओळखले . नंतर गप्पा-टप्पा झाल्या ती निघूनही गेली पण इस "परदेके पिछे क्या है ?" हा विचार माझ्या मनात घोळत राहिला. 
                                तेव्हापासून "स्कार्फ''हा माझ्या संशोधनाचा किंबहुना कुतुहलाचा विषय झाला . मी रोज येता-जाताना ,बस मध्ये ,अवती -भोवती ,विविध रंगानी नटलेले ,नक्षीदार स्कार्फ न्याहाळू लागलो . नंतर माझ्या मोजणीत मला असे आढळुन आले की ,सर्वसाधारण पणे प्रत्येक १०महिलांमागे ७महिला स्कार्फ वापरतात . त्यातही वय ,शिक्षणानुसार भिन्नता आढळते . सुशिक्षित ,कॉलेज तरुणी मध्ये हेच प्रमाण वाढल्याचे दिसते.स्कार्फ वापरण्याच्या कारणाची मीमांसा केल्यास धुळ ,धुप ,प्रदूषण यापासून बचाव हेच कारण प्रामुख्याने आढळते.  
                                जरी हे खरे असले तरी , प्रदूषण नियंत्रणा साठी आपण काय करतो ?किती उपाय अमलात आणतो ?प्रत्येकाने स्वताच्या वाढदिवशी १च झाड लावले तरी ,भारतात १२१कोटि झाडे लावाली जातील ,याकडे आपण सहज कानाडोळा करतो अन स्कार्फ ला जवळ करतो .
                                राज्यघटनेने मुलभुत अधिकाराखाली (कलम १९ )अभिव्यक्ती स्वातंत्र लोकाना बहाल केले आहे ,त्यामुळेच स्कार्फ वर बंदी येऊ शकणे अवघड आहे . पण नाण्याची दुसरी बाजू हि विचारात घ्यावी लागेल,ती म्हणजे दहशतवादी त्याच्या अतिरेकी कारवाया पूर्णत्वास नेण्यासाठी ,कैमेरा च्या नजरेतुन सुटण्यासाठी स्कार्फ चा वापर करत आहेत. युरोपियन देशांनी फ्रान्स ,बेल्जिउम ,स्पेन नी म्हणूनच बुरखा बंदी लागु केली असतानाचनेमकी याच वेळी आपल्याकडे स्कार्फ वापरण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते . आता तर पुरुष हि यात मागे राहिलेले नाहीत .                  
                                भारताने कित्येक वर्ष पारतंत्रात घालवल्याने स्वातंत्राची खरी किमत आपल्याहून कोणाला चांगली कळेल ?म्हणूनच नागरीकांच्या स्वातांत्राचां मान राखत आणि  त्यानीही सामजिक बांधिलकी जपुन ,समाजहितास बाधा होणार नाही आणि देश्द्रोहीना याचा फायदा होणार तर नाही ना याची काळजी घ्यावी . बाकि "परदे के पीछे क्या है "हे ज्याचे त्यालाच ठरवुद्या