"दोन हाणा पण ,शिकलेला म्हणा "......
देशाच्याच नव्हे तर आता आपल्या राज्यासाच्या हि राजकारणात 'दोन हाणा पण ,शिकलेला म्हणा ' हि म्हण रुजु पहातेय.केंद्रिय मंत्री स्म्रुती ईराणी पासुन सुरु झालेला हा प्रवास नंतर दिल्लीतील आप चे आमदार तोमर ,महाराष्ट्रातील भा.ज.प.चे आमदार बबनराव लोणीकर मार्गे तावडे पर्यत येउन थाम्बला आहे.(पुढे काय होइल देव जाणे )
निवडणुकीच्या वेळेस ,निवडणुक आयोगा ला दिलेल्या इतर हि माहिती बरोबर शैक्षणिक बाबीचे हि स्पष्टीकरण द्यावे लागते.दिलेल्या प्रतिद्न्यापत्रात अन वास्तवात जर काहि तफावत आढळली तर ,कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागते.(इथे मला जरा शंका वाटते ).पण सध्याची परिस्तिती पहाता राजकारण्यामध्ये खोटी माहिती ,प्रतिद्न्यापत्र देण्याची चढाओढ लागल्याचे आपणास दिसते.(मग ते भुजबळाचे मालमत्ता प्रकरण हि का असेना.)
वरिल सर्व प्रकरणात 'शाह'निशा होउन शिक्षा होइल ना, होइल हा भाग वेगळा पण नैतिकतेच्या चेष्म्यातुन हे प्रकरण पाहिले असता फारसे चांगले चित्र दिसत नाहिय,कारण लोकशाहिच्या मंदिरात प्रवेश मिळवाच्या आधि याच मंदिराचे नियम धाब्यावर बसवण्याचे काम यथासांग रित्या पार पाडले जात आहे.ज्या लोकशाहि मंदिराच्या पायर्यावर नतमस्तक होउन जगातील सर्वात मोठ्या लोकशाहिचा गाडा हाकायला सुरवात करणार्या मोदिच्या स्वपक्षीयाना हि याचे भान नसावे ,ते हि सुशासनाची ग्वाहि देउन हि याचेच नवल वाटते.
राजकीय द्वेषा च्या द्रुष्टी ने जरी दिल्ली प्रकरण घडले असले तरी ,महाराष्ट्रात भा.ज.प.ची अवस्था 'मी नाहि त्यातली अन ,कडी लाव आतली 'अशीच म्हणावी लागेल कारण ,त्यानी स्वत:च चिखलात दगड मारुन स्वत:च्याच अंगावर चिखल उडवुन घेतला आहे.मुळात कोणताहि शैक्षणिक निकषाची परिपुर्णता मंत्री ,राजकारणी होण्यासाठी करावी लागत नसताना हि बनावट पदवी प्रमाणपत्राचा खटाटोप हा "दोन हाणा पण ,शिकलेला म्हणा " यासाठीच नसेल हे कशावरुन?
दिखाउपणा करण्यातुन हे सर्व रामायण घडले असुन सुशिक्षितपणा चे बिरुद मिरवण्यातच हे धन्य मानणारे आहेत.मा.वसंतदादा पाटिल यांचे शिक्षण जरी कमी झालेले असले तरी त्यानी मिळवलेल्या द्यानाने त्याच्या शिक्षणावर मात केली.उत्तम राजकारणी होण्यासाठी नुसते शिक्षण उपयोगी नाहि तर त्याबरोबर दुरद्रुष्टी,कुशल असे नेत्रुत्व गुण हि हवेत ज्याच्या जोरावर तुम्हि देशाला ,राज्याला पुढे घेउन जाल.आणि देशापरी असणारे हे उत्तरदायित्व तुम्हि कसे निभावता यावरच तुमचे राजकिय यशापयश अवलम्बुन असेल.
Wednesday, 24 June 2015
"दोन हाणा पण ,शिकलेला म्हणा ".......
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment