परदे के पिछे क्या है ?
शुक्रवारी माझे काम संपवुन मी घरी परतण्याच्या बेतात बस थांब्या ला उभा होतो. अचानक 'प्रिया' हि माझी एक जुनी मैत्रिण मला हाक मारू लागली,मला काहिच समजेना कारण तिने चेहर्याला "स्कार्फ" बांधला होता .मी हि काहीश्या अनोळखी भावमुद्रेने तिला न्याहाळत होतो ,बहुतेक तिला समजले आणि स्कार्फ काढला,मगच मी तिला ओळखले . नंतर गप्पा-टप्पा झाल्या ती निघूनही गेली पण इस "परदेके पिछे क्या है ?" हा विचार माझ्या मनात घोळत राहिला.तेव्हापासून "स्कार्फ''हा माझ्या संशोधनाचा किंबहुना कुतुहलाचा विषय झाला . मी रोज येता-जाताना ,बस मध्ये ,अवती -भोवती ,विविध रंगानी नटलेले ,नक्षीदार स्कार्फ न्याहाळू लागलो . नंतर माझ्या मोजणीत मला असे आढळुन आले की ,सर्वसाधारण पणे प्रत्येक १०महिलांमागे ७महिला स्कार्फ वापरतात . त्यातही वय ,शिक्षणानुसार भिन्नता आढळते . सुशिक्षित ,कॉलेज तरुणी मध्ये हेच प्रमाण वाढल्याचे दिसते.स्कार्फ वापरण्याच्या कारणाची मीमांसा केल्यास धुळ ,धुप ,प्रदूषण यापासून बचाव हेच कारण प्रामुख्याने आढळते.
जरी हे खरे असले तरी , प्रदूषण नियंत्रणा साठी आपण काय करतो ?किती उपाय अमलात आणतो ?प्रत्येकाने स्वताच्या वाढदिवशी १च झाड लावले तरी ,भारतात १२१कोटि झाडे लावाली जातील ,याकडे आपण सहज कानाडोळा करतो अन स्कार्फ ला जवळ करतो .
राज्यघटनेने मुलभुत अधिकाराखाली (कलम १९ )अभिव्यक्ती स्वातंत्र लोकाना बहाल केले आहे ,त्यामुळेच स्कार्फ वर बंदी येऊ शकणे अवघड आहे . पण नाण्याची दुसरी बाजू हि विचारात घ्यावी लागेल,ती म्हणजे दहशतवादी त्याच्या अतिरेकी कारवाया पूर्णत्वास नेण्यासाठी ,कैमेरा च्या नजरेतुन सुटण्यासाठी स्कार्फ चा वापर करत आहेत. युरोपियन देशांनी फ्रान्स ,बेल्जिउम ,स्पेन नी म्हणूनच बुरखा बंदी लागु केली असतानाचनेमकी याच वेळी आपल्याकडे स्कार्फ वापरण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते . आता तर पुरुष हि यात मागे राहिलेले नाहीत .
भारताने कित्येक वर्ष पारतंत्रात घालवल्याने स्वातंत्राची खरी किमत आपल्याहून कोणाला चांगली कळेल ?म्हणूनच नागरीकांच्या स्वातांत्राचां मान राखत आणि त्यानीही सामजिक बांधिलकी जपुन ,समाजहितास बाधा होणार नाही आणि देश्द्रोहीना याचा फायदा होणार तर नाही ना याची काळजी घ्यावी . बाकि "परदे के पीछे क्या है "हे ज्याचे त्यालाच ठरवुद्या