Wednesday, 28 October 2015

जीवनाचा प्रवास.


                जीवनाचा प्रवास


जीवनाचा प्रवास एका अजब वळणावर आला आहे.
काल जे सोबत होते ते आज नाहित ,
उद्या जे सोबत देणार आहेत,ते हि आज नाहित
आज मात्र मी, एकटाच प्रवास करणार आहे.


जीवनाचा प्रवास एका अजब वळणावर आला आहे.
जे येतील त्यांना घेउन,
जे येणार नाहित त्यांच्याविना,
आज मात्र मी,एकटाच प्रवास करणार आहे.


जीवनाचा प्रवास एका अजब वळणावर आला आहे.
जीवलगांच्या आठवणी मनात साठवत,
कोसळलेल्या दु:खाचे हलाहल पचवत,
आज मात्र मी, एकटाच प्रवास करणार आहे.


जीवनाचा प्रवास एका अजब वळणावर आला आहे.
जन्मानंतर सुरु झालेला हा प्रवास ,
आता वेगाने शेवटाकडे जात आहे,
आज मात्र मी, एकटाच प्रवास करणार आहे..


©S.Suresh
Plz visit http://shrinivasdeshpande.blogspot.in

Monday, 26 October 2015

वेडा प्रेमी.......


                      वेडा प्रेमी.......

किती आठवण काढली,आता कुठे  भेटलीस तु.

उशीरा का होईना पण ,शेवटी भेटलीस तु.

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,साथ मला देशील तु?

दुखाच्या सारीपाटावर ,सुखाचा डाव मांडशील तु?

या गरीबाची चटणी —भाकर गोड मानशील तु?

या वेड्या प्रेमी कडे एखादी तरी नजर टाकशील तु?

माहित नाहि ,माझ्या या प्रश्नांची उत्तरे काय असतील?

पण यावरच माझ्या उरलेल्याआयुष्याचे दिवस तर नसतील??


                                                                 © S.Suresh.

Wednesday, 21 October 2015

माझे अस्तित्व

                         माझे अस्तित्व

माझे अस्तित्व नकारणार्यासाठी कदाचित मी संपलेला असेन,

सर्व काहि असुनहि मी फक्त त्यांच्यासाठीच संपलेला असेन.

संपलेल्याचे संपलेपण म्हणुनही मी कदाचित त्यांना बोचत असेन,

या बोचलेपणाच्या भांडवलावरच मी त्यांच्यासाठी अस्तित्वात असेन...

                                                                            © S.Suresh.

Wednesday, 8 July 2015

व्यापम ...देर आये , दुरुस्त आये

                                     व्यापम ....देर आये ,दुरुस्त आये.
       व्यावसायिक परिक्षा मंडल (व्यापम ),मध्य प्रदेश चा घोटाळा हा देशातील सर्वात मोठा घोटाळा ठरु पहातोय.वैद्यकिय ,अभियांत्रिकी च्या  अभ्यासक्रमासाठी ची प्रवेश परिक्षेची जबाबदारी या मंडळावर होती ईथवर सर्व ठीक होते.परंतु ,राज्यशासनाचे प्रशासकीय अधिकारी नेमण्याची जबाबदारी हि व्यापम वर टाकुन भ्रष्टाचार्याना जणु चराउ कुरणच खुले करुन दिले.
      आणि येथुनच घोटाळा बाहेर येउ लागला.परिक्षेला तोतया विद्यार्थी बसवणे ,लाच घेउन अधिकारी भरती करणे,पात्रता नसताना चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळवुन देणे  असे 1ना अनेक प्रकार हळु हळु बाहेर येउ लागले.मध्य प्रदेशातील काहि व्हिसल ब्लोअर नी हळु हळु या प्रकरणातील एक ,एक धागे -दोरे बाहेर आणले.तर आता त्याचाच जीव धोक्यात येउ पहातोय कारण यात आतापर्यत 1नव्हे ,2नव्हे तर तब्बल 45हुन जास्त जणाना आपला जीव गमवावा लागला आहे.मग तो राज्यपालांचा मुलगा असेना नाहितर वैद्यकिय महाविद्यालयाचे डिन ,पोलिस ,पत्रकार ,विद्यार्थी कोणीहि यातुन सुटु शकले नाहित.यातील साधारणपणे 15जाणांचा म्रुत्यु हा संशयास्पद आहे ,
       यात आतापर्यत 1800हुन अधिक जणाना अटक करण्यात आली आहे.ईतके भयाण वास्तव समोर असताना राज्याचे ग्रुह मंत्री बाबुलाल ,"जो जन्माला येतो ,तो एकदा ना एकदा मरणारच "अशी वाचाळगिरी करताना दिसत आहेत.मरणारी प्रत्येक व्यक्ती जरी व्यापम शी सम्बधित नसली तरीव्यापम शी सम्बधित असणार्याचे असे  संशयास्पद होणारे म्रुत्यु ची वाढणारी आकडेवारी दुर्लक्षित करुन चालणार नाहि.
        सलग 3दा बहुमताच्या जोरावर मध्य प्रदेश मध्ये भाजपा सरकार आहे.भाजपा सरकारचे काम SIT (Special Investigation  Team )नेमुन झाले का? SIT नेमली कि त्याची जबाबदारी सम्पते का ?कारण हि SIT शेवटि सरकारच्या खालीच काम करणार आहे.पारदर्शी कारभारची ग्वाहि देणारे भाजप सरकार चा CBI चौकशीस का विरोध होता?पण जनमताच्या रेट्यापुढे त्यानी माघार घेउन त्यानी CBI चौकशी ची मागणी केली.भाजपाला या उशीरा सुचलेल्या शहाणपणाचे 'देर आये ,दुरुस्त आये 'म्हणुन स्वागत करावे लागेल.
         एकिकडे जगात भारतातील वैद्यकिय ,अभियांत्रिकि च्या विद्यार्थाना मागणी वाढत असतानाच दुसरीकडे व्यापम सारख्या प्रकरणामुळे भविश्यात आपल्या विद्यार्थीच्या गुणवत्तेबाबत शंका घेतली जाउ शकते.त्यात हुशार ,गुणवान विद्यार्थीची अवस्था 'गव्हा बरोबर किडे रगडल्या प्रमाणे होइल ' . 'स्किल इंडिया 'अशी घोषणा देणारे मोदि विद्यार्थीच्या स्किल शी सम्बधित प्रकरणात मात्र  "मौनि बाबा " झालेत.

Sunday, 28 June 2015

परदे के पिछे क्या है ?

            परदे के पिछे क्या है  ?
       शुक्रवारी माझे काम संपवुन मी घरी परतण्याच्या बेतात बस थांब्या ला उभा होतो.  अचानक 'प्रिया' हि माझी  एक जुनी मैत्रिण मला हाक मारू लागली,मला काहिच समजेना कारण तिने चेहर्याला "स्कार्फ" बांधला होता .मी हि काहीश्या अनोळखी भावमुद्रेने तिला न्याहाळत होतो ,बहुतेक तिला समजले आणि स्कार्फ काढला,मगच मी तिला ओळखले . नंतर गप्पा-टप्पा झाल्या ती निघूनही गेली पण इस "परदेके पिछे क्या है ?" हा विचार माझ्या मनात घोळत राहिला. 
                                तेव्हापासून "स्कार्फ''हा माझ्या संशोधनाचा किंबहुना कुतुहलाचा विषय झाला . मी रोज येता-जाताना ,बस मध्ये ,अवती -भोवती ,विविध रंगानी नटलेले ,नक्षीदार स्कार्फ न्याहाळू लागलो . नंतर माझ्या मोजणीत मला असे आढळुन आले की ,सर्वसाधारण पणे प्रत्येक १०महिलांमागे ७महिला स्कार्फ वापरतात . त्यातही वय ,शिक्षणानुसार भिन्नता आढळते . सुशिक्षित ,कॉलेज तरुणी मध्ये हेच प्रमाण वाढल्याचे दिसते.स्कार्फ वापरण्याच्या कारणाची मीमांसा केल्यास धुळ ,धुप ,प्रदूषण यापासून बचाव हेच कारण प्रामुख्याने आढळते.  
                                जरी हे खरे असले तरी , प्रदूषण नियंत्रणा साठी आपण काय करतो ?किती उपाय अमलात आणतो ?प्रत्येकाने स्वताच्या वाढदिवशी १च झाड लावले तरी ,भारतात १२१कोटि झाडे लावाली जातील ,याकडे आपण सहज कानाडोळा करतो अन स्कार्फ ला जवळ करतो .
                                राज्यघटनेने मुलभुत अधिकाराखाली (कलम १९ )अभिव्यक्ती स्वातंत्र लोकाना बहाल केले आहे ,त्यामुळेच स्कार्फ वर बंदी येऊ शकणे अवघड आहे . पण नाण्याची दुसरी बाजू हि विचारात घ्यावी लागेल,ती म्हणजे दहशतवादी त्याच्या अतिरेकी कारवाया पूर्णत्वास नेण्यासाठी ,कैमेरा च्या नजरेतुन सुटण्यासाठी स्कार्फ चा वापर करत आहेत. युरोपियन देशांनी फ्रान्स ,बेल्जिउम ,स्पेन नी म्हणूनच बुरखा बंदी लागु केली असतानाचनेमकी याच वेळी आपल्याकडे स्कार्फ वापरण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते . आता तर पुरुष हि यात मागे राहिलेले नाहीत .                  
                                भारताने कित्येक वर्ष पारतंत्रात घालवल्याने स्वातंत्राची खरी किमत आपल्याहून कोणाला चांगली कळेल ?म्हणूनच नागरीकांच्या स्वातांत्राचां मान राखत आणि  त्यानीही सामजिक बांधिलकी जपुन ,समाजहितास बाधा होणार नाही आणि देश्द्रोहीना याचा फायदा होणार तर नाही ना याची काळजी घ्यावी . बाकि "परदे के पीछे क्या है "हे ज्याचे त्यालाच ठरवुद्या  

Wednesday, 24 June 2015

"दोन हाणा पण ,शिकलेला म्हणा ".......

                               "दोन हाणा पण ,शिकलेला म्हणा "......
        
           देशाच्याच नव्हे तर आता आपल्या राज्यासाच्या हि राजकारणात  'दोन हाणा पण ,शिकलेला म्हणा ' हि म्हण रुजु  पहातेय.केंद्रिय मंत्री स्म्रुती ईराणी पासुन सुरु झालेला हा प्रवास नंतर दिल्लीतील आप चे आमदार तोमर ,महाराष्ट्रातील भा.ज.प.चे आमदार बबनराव लोणीकर मार्गे तावडे पर्यत येउन थाम्बला आहे.(पुढे काय होइल देव जाणे )
           निवडणुकीच्या वेळेस ,निवडणुक आयोगा ला दिलेल्या इतर हि माहिती बरोबर शैक्षणिक बाबीचे हि स्पष्टीकरण द्यावे लागते.दिलेल्या प्रतिद्न्यापत्रात अन वास्तवात जर काहि तफावत आढळली तर ,कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागते.(इथे मला जरा शंका वाटते ).पण सध्याची परिस्तिती पहाता राजकारण्यामध्ये खोटी माहिती ,प्रतिद्न्यापत्र देण्याची चढाओढ लागल्याचे आपणास दिसते.(मग ते भुजबळाचे मालमत्ता प्रकरण हि का असेना.)
           वरिल सर्व प्रकरणात 'शाह'निशा होउन शिक्षा होइल ना, होइल हा भाग वेगळा पण नैतिकतेच्या चेष्म्यातुन हे प्रकरण पाहिले असता फारसे चांगले चित्र दिसत नाहिय,कारण लोकशाहिच्या मंदिरात प्रवेश मिळवाच्या आधि याच मंदिराचे नियम धाब्यावर बसवण्याचे काम यथासांग रित्या पार पाडले जात आहे.ज्या लोकशाहि मंदिराच्या पायर्यावर नतमस्तक होउन जगातील सर्वात मोठ्या लोकशाहिचा गाडा हाकायला सुरवात करणार्या मोदिच्या स्वपक्षीयाना हि याचे भान नसावे ,ते हि सुशासनाची ग्वाहि देउन हि याचेच नवल वाटते.
             राजकीय द्वेषा च्या द्रुष्टी ने जरी दिल्ली प्रकरण घडले असले तरी ,महाराष्ट्रात भा.ज.प.ची अवस्था 'मी नाहि त्यातली अन ,कडी लाव आतली 'अशीच म्हणावी लागेल कारण ,त्यानी स्वत:च चिखलात दगड मारुन  स्वत:च्याच अंगावर चिखल उडवुन घेतला आहे.मुळात कोणताहि शैक्षणिक निकषाची परिपुर्णता मंत्री ,राजकारणी होण्यासाठी करावी लागत नसताना हि बनावट पदवी प्रमाणपत्राचा खटाटोप  हा "दोन हाणा पण ,शिकलेला म्हणा " यासाठीच  नसेल हे कशावरुन?
              दिखाउपणा करण्यातुन हे सर्व रामायण घडले असुन सुशिक्षितपणा चे बिरुद मिरवण्यातच हे धन्य मानणारे आहेत.मा.वसंतदादा पाटिल यांचे शिक्षण जरी कमी झालेले असले तरी त्यानी मिळवलेल्या द्यानाने त्याच्या शिक्षणावर मात केली.उत्तम राजकारणी होण्यासाठी नुसते शिक्षण उपयोगी नाहि तर त्याबरोबर दुरद्रुष्टी,कुशल असे नेत्रुत्व गुण हि हवेत ज्याच्या जोरावर तुम्हि देशाला ,राज्याला पुढे घेउन जाल.आणि देशापरी असणारे हे उत्तरदायित्व  तुम्हि कसे निभावता यावरच तुमचे राजकिय यशापयश अवलम्बुन असेल.

Sunday, 8 March 2015

महिला दीन नाहि , महिला दिन होय

       कंटाळा आला म्हणुन टिव्हि वरील 'क्राईम पेट्रोल ' मालिका पहात होतो.कथा प.बंगाल मधील होती.गावात नविनच आलेला पहुणा त्या गावातील दहावीत शिकणार्या मुलीला स्वताच्या प्रेमात फसवुन लग्नाचे खोटे आमिश देवुन मुम्बई ला नेउन विकतो.पुढे पोलिस त्याचा छडा लावुन त्या मुलीला सोडवुन आणतात.म्हणतात ना ,"शेवट गोड तर ,सर्वच गोड". अशा रितीने तो कार्यक्रम समाप्त होतो तो , माझ्या डोक्यात विचारांचे चक्र चालु करुनच ...
         अशा एकच नाहि तर अनेक भुतकाळात घडलेल्या एक -एक घट्नाचा पट माझ्या नजरे समोरुन पुढे सरकत रहातो.मलाला ,निर्भया पासुन सुरु झालेला किम्बहुना, त्याहि कितीतरी आधिपासुन सुरु झालेला असला प्रवास या आताच्या घटनेपाशी येउन थाम्बतो.
काय शिकलो आपण या घटनांतुन ? मनुष्य हा सर्वात बुद्धिमान प्राणी आहे असे बिरुद मिरवणारे आपण ,काय शिकलो या घटनांतुन ? नाहिय काहि उत्तर आपल्याकडे.या अशा रोज घडणार्या घटनातुन आपण काहि शिकतच नाहि कि काय ?मग स्वतला बुद्धिमान प्राणी
म्हणायचा अट्टहास कशासाठी? चुकांतुनच शहाणपण येते ,हेही विसरलोत की काय आपण?
        शाहु -फुले -आबेड्कर -कर्वे याच्याच मातीत जन्माला आलेलो आम्ही ,त्याच्याच विचाराना 'तिलंजाली 'द्यायला निघालो आहोत असेच दिसतेय.असेच आपण जात राहिलो तर महासत्ता होणे तर दुरच, पण तसा विचार करणे हि व्यर्थ होय.
रोटी ,कपडा ,मकान या मुलभुत गोष्टिचा जेव्हा विचार करतो तेव्हा ,त्यात स्त्रियाना   सामाजिक सुरक्षा या मुलभुत गोष्टि कडे अगदि सहज कानाडोळा करतो.महिलान वरिल असे अत्याचार हे सामाजिक सुरक्षा आणि समाजाचि वैचारिक पातळी च्या अभावाने होत आहेत कारण ,या दोन्हि एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत.म्हणुनच सामाजिक सुरक्षा साठी सर्वोउत्तम कायदे आणि समाजाचि वैचारिक पातळी उचावण्यासाठी उत्तम शिक्षण आश्या दोन्हि पाताळीवर लढायचे आहे.एकुणच प्रश्न जटिल आहे ,पण कोणत्याहि एका प्रकारे विचार करुन समस्येचे निराकरण होणार नाहि ,तर सर्वच बाजुनी सारासार विचार करावा लागेल.
         जुन्या रुढि ,परम्पराना छेद देत महिला आता सर्वच क्षेत्रात पुढे येत आहेत उदा.-अरुंधती भाट्टाचार्य (भारतीय स्टेट बेक ),चंदा कोचर (ICICI Bank )ई.नव्हे तर ईतर अनेकानी आपापल्या क्षेत्रात यशाची अनेक शिखरे पादाक्रांत करीत आहेत,यासाठी त्याना प्रोत्साहना बरोबरच सुरक्षित वातावारण निर्माण करावयास हवे .जेणेकरुन महिला निसंकोच पणे पुढे येतील .
          'बेटी बचाओ' , 'सुकन्या सम्रुद्धि'  सारख्या योजनांची घोषणा करण्यापुरती सरकारचे काम मर्यादित न रहाता, त्या योजना समाजाच्या तळागाळा पर्यंत राबवल्या जात आहेत का? त्यांचा फायदा समाजातील शेवटच्या व्यक्ती पर्यंत होतो आहे का ?हे पहाणे जरुरीचे आहे. कायदे करणे जितके सोपे तितकेच त्यांची अमलबजावणी करणे अवघड असते.म्हणुनच प्रत्येक महिला दिन ला बौधिक प्रवचन न होता प्रत्येकाने स्वतपुरती का होईना अमलबजावणी करावी .
           अचानक भानावर आलो,पहातो तर काय, टि व्हि चालुच होता .एक कार्यक्रम सम्पुन दुसरा सुरु झाला होता .पण माझ्या डोक्यातील विचारांचे माजलेले काहुर सम्पता सम्पेना .खुप रात्र झाली होती टिव्हि बंद करुन मीहि झोपावयास गेलो ,खिडकितुन बाहेर पाहिले निरव शांतता पसरली होती .सर्व जण "गाढ " झोपले होते उद्याचा  सुर्योदय होण्याच्या आशेवर ........मीहि मग झोपलो सुर्योदय होण्याच्याच आशेवर,असा सुर्योदय की ज्यात माहिला खर्या अर्थाने स्वतंत्र असतील .

Thursday, 19 February 2015

आरोग्याची राजकीय हेळसांड

विलासराव देशमुख ,मुंडे आणि आता आर .आर .पाटिल यांचे असे अकस्मात जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारनाची कधीच भरुन न येणारि हानी झाली आहे.राजकारणरुपी समाजकाराणाचा वसा घेणार्या नेत्याना निवड्णुका ,राजकीय दौरे ,भेटी ,कार्यकर्त्या साठी चा वेळ ,पदाची जबाबदारी ,मिटिंग यातुन स्वताच्या आरोग्या कडे लक्ष देण्यास फारसा वेळ भेट्ला तर नवलच !
    त्यातुन रात्री -अपरात्रीचा प्रवास ,वेळी -अवेळी होणारे जेवण यातुन उद्भवणारे आजार आणि ते किरकोळ वाटुन त्याकडे व्यस्त कार्यक्रमामुळे होणार्या दुर्लक्ष मुळे हे आजार बळावतात परिणामी अशा घटनाना तोंड द्यावे लागते.अशा घटनेने होणारी हानी ही त्या व्यक्तीच्या कुटुम्बापुरती मर्यादीत न राहाता ती राज्याच्या जनमानसावर परीणाम करते .
     जनसेवेची व्रत पुर्ण करताना "आरोग्य हीच खरी दौलत " या उक्ती नुसार आधी आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्याचा स्वार्थ प्रत्येक राजाकार्ण्यानी साधावा ,कारण शेवटी "सर सलामत तो पगडी पचास " 

Saturday, 24 January 2015

Bankers Adda: Why IBPS Changed pattern of IBPS PO and IBPS Clerk...

Bankers Adda: Why IBPS Changed pattern of IBPS PO and IBPS Clerk...: Dear readers, most of you are aware that recently, IBPS has made change in recruitment process of  Probationary Officers Clerical cadres, wh...

Friday, 16 January 2015

Islamic Banking.........

Last couple of years we frequently heard about new concept in banking industries i.e.Islamic Banking which was started in Kerala state.Hence i m going to elaborate this concept as per my knowledge.                                                                                                                                  Islamic Banking can be defined as,banking activity that is consistent with principles of Sharia and its practicle application for development of Islamic activity.Which is totally based on Islamic faith and within limits of Islamic law.                                                                                                            Principle of Islamic Bank-        
 * No intreast paid to depositor nor charged from borrower.
 * No support to ZULMI economic activity.
 * No finance to activity involving speculation.
 * Not financing for production of goods and services which               violates Islamic values.
 * Basic principle of Islamic bank=Risk sharing,Profit sharing.
 

                                 1st Islamic bank estd. in late 1950s in rural area of Pakistan,but 1st Modern Commercial Islamic  Bank  is Dubai Islamic Bank1975.

                                 In this Islamic Bank system instead of lending to buyer for purchase item bank might buy item itself from seller and Bank resell it to buyer to earn profit ,allowing buyer to pay in installments ,there are no penenalties for delay payment.