अपयश च्या गर्तेत जीवाचा कोंडमारा होत आहे , अपेक्षाच्या ओझेखाली जीव मेटकुटीला येत आहे . कोण आपले? कोण परके ? यातील फरक हळूहळू नाहीसा होत आहे , आपले म्हणणारेच "आपले " आता आपली साथ सोडत आहेत . अपयश ! अपयश !! अपयश!!! अपयशाच्या फेरयात आता मी पुरता गुरफटलो आहे , यशाच्या पहाटेची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे . अपयशाचे हे कडु विष पचवत ,पचवत मी पुढे जात आहे , यातच माज़े आयुष्य मात्र हळुहळु संपत आहे . आयुष्याच्या वळणावर आलेल्या अपयशाला आता जीव घाबरला आहे , जगण्याची जिद्द कदाचित तो हरवून बसला आहे . जीवनाच्या सारिपटावर असा हा माझा खेळ चालू आहे , नशिबालाही आव्हान देणारा मी ,आता मात्र त्याला शरण आलो आहे . पण जा ,जाऊंन सांगा त्याला हे अपयशाचे हलाहल पचवून अजूनही मी उभा आहे ,अपयश विरुद्ध लढण्यची अजूनही जिद्द बाकी आहे
Don't lose hope, you never know what tomorrow will bring. .....
ReplyDeletethnx
DeleteHey dear... Nice lines but aaply it in reverse way....we all r with u
Delete