मार्च महिना आला की सर्वाना वेध लागतात ते ८ मार्चचे ,जागतिक महिला दिनाचे. सर्व वृत्तपत्रे रकनेच्या रकने भरुन वुमेन एम्पोएवरमेंट बद्दल बोलू लागतात.नेहमीप्रमाणे हे ही वर्ष यास अफवाद राहिल तर कसे?......विषय निघलाच आहे तर चला आज मी तुम्हाला उत्तर पुर्व अफ्रिका खंडातील प्रामुख्याने सोमलियातील एका धगधगत्या वास्तवाने रुबरू करणार आहे.
सोमालिया हा अफ्रिका खंडातील हिंदी महासगराला लागुन असणारा देश,या देशात वुमेन एम्पोवेरमेंट च्या नावाने जगभर टेंभा मिरवणारया देशांच्या डोळयात झ़णझ़णीत अंजन घालणारी प्रथा पाळली जातेय FEMALE GENITAL MUTILATION (FGM)या मधे फेरॉनिक सुरकमसिजन (योनी मार्गाचा सुन्ता )ही एक शस्त्रक्रिया असते ,यात कल्यटोरिस (योनि उंचावटा ) सर्व किंवा काही भाग छटला जातो ,आणि ज़खम शिवुन योनिमुख बन्द केले जाते ,फ़क्त यूरिन आणि मेंस्ट्रुअल साईकल साठी लहान छिद्र ठेवले जाते. या लांछनास्पद प्रथेमागे कोणतेही धार्मिक कारण नाही ,कारण कुरान,बायबल मधे कुठेही या प्रथेचे समर्थन केलेले आपणास दिसत नाही ,तर हि प्रथा पुरुषी वर्चस्वातुन तयार झालेली मानसिकता आणि संशयाचे अपत्य आहे .अत्याचार, एसिड हल्ले ,कुत्सित नजरा ,आणि आता असल्या हया लांछनस्पद प्रथा हे सर्व थांबणयाऐवजीकुठेतरी वाढतच जाताय नाही का ? जन्माल्यानंतर १ आठवडा ते ५ वर्षच्या आताच FGM केली जाते.खेळणे ,हुंदडणे,बागडणे च्या वयातच फुलणारी कलीतुम्ही कोमेजुन टाकाता तरी कशी? इजिप्त मधील फ़रोआ बायकोला सोडुन जाताना तिची जबरदस्तीने FGM करत कारण तिने इतरांशी संबंध ठेवुनयेत ,आणि सोमलियामधे FGMकेलेल्या मुली "हलाल"(पवित्र ) समजल्या जातात ,तर न केलेल्या "हराम"(अपवित्र )असा दावा FGMचे समर्थन करणारे करतात,यात भर म्हणून की काय,मुलींचे आई ,वडील देखिल त्यांच्या 'हो'मध्ये 'हो 'मिसळतात,त्यांचा असा दावा आहे की , ही शस्त्रक्रिया केल्येशिवाय त्यांच्या मुलींना समाजात सन्मानाने राहता येणार नाहि.आतापर्यंत १२५ मिलियन महिलांनी आणि मुलींनी ही शस्त्रक्रिया करुन घेतली आहे.आणखी म्हणजे ही शस्त्रक्रिया करताना भूल दिली जाते का ?,योग्य,निर्जंतुक उपकरणें वापरतात का ?या प्रश्नांची उत्तरे कोणाकडेही नाहित,आणि या शस्त्रक्रियामुळे त्या मुलीला रक्तस्त्राव ,दुखणे ,रक्तगुठल्या,मुल जन्मताना अनेक धोके निर्माण होतात . कधी आई ,कधी बहिण ,कधी सहचर अशा अनेक रुपात ववरणार्या स्त्री ला आज ही सीते सारखी ही परीक्षा द्यावी लागते याचेच वाईट वाटत आहे . आणि यासाठीच आपल्या सर्वाना एकत्र येऊन अशा वर्चस्व करू पाहणार्या पुरुषी वर्चस्वातुन आलेल्या मानसिकतेला शह द्यायचा आहे .त्यांनी केलेला हल्ला मग तो असिड ,अत्याचार ,घाणेरडे कमेंट ,स्पर्श, हावभाव,FGMसारख्या पद्धति अन्यथा कोणत्याही प्रकारे असो ,अपणा सर्वाना तो नुसता परतावुन लावयाचा नाही तर तो पुनः निर्माणच होणार नाही याकडे लक्ष द्यावे लागणार आहे .म्हणूनच सांगतो फ़क्त वूमेन्स डे ला फेसबुक ,ट्विट्टर ,व्हाट्सऐप वर वूमेन्स डे ची लिंक ,फोटो ,कमेंट टाकले की आपले काम खरेच संपते का? खरच याचा विचार प्रत्येकाने करावा .दररोज़ एक ,एक पाऊल जरी या दिशेने टाकले तरी ''मंज़िल दुर नहीं है मेरे यार। ''