Tuesday, 4 November 2014

MPSC कडुन STI ची जाहिरात 2014 ........

आजच Mpsc कडुन, STI या पदासाठी 445जागांसाठी 1फेब्रुवारी रोजी होणार्या  परिक्षेची जाहिरात काढण्यात आली आहे .सदरची सविस्तर जाहिरात आपणास सकाळ वर्तमानपत्रात पुणे विभागा मध्ये पहावयास मिळेल .........                                        

STI Prelims Exam Syllabus

New syllabus from 2013.
सामान्य क्षमता चाचणी:
प्रश्नसंख्या – १००   एकूण गुण – १००   दर्जा – पदवी   वेळ – १ तास  प्रश्न स्वरूप – वस्तुनिष्ठ
१. चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील
२. नागरिकशास्त्र - भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन), गरम व्यवस्थापन (प्रशासन)
३. आधुनिक भारताचा विशेषत:  महाराष्ट्राचा इतिहास
४. भूगोल  (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष संदर्भासह): पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे, इत्यादी.
५. अर्थव्यवस्था – भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्त्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य , मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी.
शासकीय अर्थव्यवस्था – अर्थसंकल्प, लेखा, लेखा परीक्षण इत्यादी
६. सामान्य विज्ञान- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र व आरोग्यशास्त्र.
७. बुद्धिमापन चाचणी व अंकगणित   .....                                                                                                                                                                             Pay Scale: Rs. 9300-34800 (Grade Pay Rs.4300/-)
Age Limit: 19 to 33 yrs (38 for backward classes)
Application: Online -5 november ते 25 november  .                             www.Mahaonline.gov.in

Sunday, 13 April 2014

स्वप्नातील ती …

                                 स्वप्नातील ती … 

आज ही  रात्री, तु  नेहमी प्रमाणे  माझ्या स्वप्नात यावे 
फुलासारख्या तुझ्या मखमली हातांनी मला थापाडावे… ।।१।।

तिथे कोणीही नको ,फक्त मी तु  अन तु  ,मी 
तिथ तू फक्त माझीच अन तुझाच मी…  ।।२।।

सागर ज्या प्रमाणे नदीचा भेटीसाठी तरसतो ,
स्वप्नांमध्ये तुझा मांडीवर डोके ठेवणारा मी, जगालाही क्षणभर विसरतो…  ।।३।।

रोज तू यावे स्वप्न्यात अन मी हि तुझ्यात रंगून जावे ,
तुझा मांडीवर डोके टेकवून आपल्या संसाराचे चित्र रंगवावे… ।।४।।

संसाराचे चित्र रंगवताना तुझा केसांची बट सारखी मध्ये च तुझ्या गालावर का बर येते ? 
तिला सारखी बाजूला करता करता मला मात्र स्वप्नातून जाग येते ..  मला मात्र स्वप्नातून जाग येते… ।।५।।
       

                                                                                                                        S..Suresh...

Saturday, 22 March 2014

रंगपंचमी



सुख दुःखाचे रंग घेऊन आली रंगपंचमी ,
सुखात दुःखाचे रंग विसरवण्यासाठी आली रंगपंचमी।

लाल ,पिवळा ,निळा ,हिरव्या रांगनी बनली रंगपंचमी ,
जीवनाच्या प्रत्येक वाटेवर रंगाचे महत्व सांगणारी रंगपंचमी।

 रणरणत्या उन्हात रंगांची सावली देणारी रंगपंचमी ,
लहान थोराना इंद्रधनुष्यच्या सप्तरंगात नहयाला लावणारी रंगपंचमी।

जातीपतीचे रंग विसारयला लावणारी रंगपंचमी ,
 सर्व धर्मियाना एकाच धर्मात बांधणारी रंगपंचमी।



Monday, 10 March 2014

''सोमालियातील धगधगते वास्तव'' .............

             मार्च  महिना आला की सर्वाना  वेध लागतात ते ८ मार्चचे ,जागतिक महिला दिनाचे. सर्व वृत्तपत्रे रकनेच्या रकने भरुन वुमेन एम्पोएवरमेंट बद्दल बोलू लागतात.नेहमीप्रमाणे  हे ही  वर्ष  यास अफवाद राहिल तर कसे?......विषय निघलाच आहे  तर चला आज मी तुम्हाला उत्तर पुर्व अफ्रिका खंडातील  प्रामुख्याने सोमलियातील एका धगधगत्या वास्तवाने रुबरू करणार आहे.                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                

सोमालिया  हा अफ्रिका खंडातील हिंदी महासगराला लागुन  असणारा देश,या देशात वुमेन एम्पोवेरमेंट च्या नावाने जगभर टेंभा मिरवणारया देशांच्या  डोळयात झ़णझ़णीत अंजन घालणारी प्रथा पाळली जातेय FEMALE GENITAL MUTILATION  (FGM)या मधे फेरॉनिक सुरकमसिजन (योनी मार्गाचा सुन्ता )ही एक शस्त्रक्रिया   असते ,यात कल्यटोरिस (योनि  उंचावटा ) सर्व किंवा काही भाग छटला जातो ,आणि ज़खम शिवुन  योनिमुख बन्द केले जाते ,फ़क्त यूरिन आणि मेंस्ट्रुअल साईकल साठी लहान छिद्र ठेवले जाते.   या लांछनास्पद प्रथेमागे कोणतेही धार्मिक कारण नाही ,कारण कुरान,बायबल मधे कुठेही या प्रथेचे समर्थन केलेले आपणास दिसत नाही ,तर हि प्रथा पुरुषी वर्चस्वातुन तयार झालेली मानसिकता आणि संशयाचे अपत्य आहे .अत्याचार, एसिड हल्ले ,कुत्सित नजरा ,आणि आता असल्या हया लांछनस्पद प्रथा हे सर्व थांबणयाऐवजीकुठेतरी वाढतच जाताय नाही का ?                                                                                                              जन्माल्यानंतर १ आठवडा ते ५ वर्षच्या आताच FGM केली जाते.खेळणे ,हुंदडणे,बागडणे च्या वयातच  फुलणारी कलीतुम्ही कोमेजुन  टाकाता तरी  कशी? इजिप्त मधील फ़रोआ बायकोला सोडुन जाताना तिची जबरदस्तीने FGM करत कारण तिने इतरांशी संबंध ठेवुनयेत ,आणि सोमलियामधे FGMकेलेल्या मुली "हलाल"(पवित्र ) समजल्या जातात ,तर न केलेल्या "हराम"(अपवित्र )असा  दावा FGMचे समर्थन  करणारे करतात,यात भर म्हणून की  काय,मुलींचे आई ,वडील देखिल त्यांच्या 'हो'मध्ये 'हो 'मिसळतात,त्यांचा असा दावा आहे की , ही  शस्त्रक्रिया केल्येशिवाय त्यांच्या मुलींना समाजात सन्मानाने राहता येणार नाहि.आतापर्यंत १२५ मिलियन महिलांनी आणि मुलींनी ही  शस्त्रक्रिया करुन घेतली आहे.आणखी म्हणजे ही शस्त्रक्रिया करताना भूल दिली जाते का ?,योग्य,निर्जंतुक उपकरणें वापरतात का ?या प्रश्नांची उत्तरे कोणाकडेही नाहित,आणि या शस्त्रक्रियामुळे त्या मुलीला रक्तस्त्राव ,दुखणे ,रक्तगुठल्या,मुल जन्मताना अनेक धोके  निर्माण होतात .  कधी आई ,कधी बहिण ,कधी सहचर अशा अनेक रुपात ववरणार्या स्त्री ला आज ही सीते सारखी ही परीक्षा द्यावी लागते याचेच वाईट  वाटत आहे .                                                                                आणि  यासाठीच आपल्या सर्वाना एकत्र येऊन अशा वर्चस्व करू पाहणार्या पुरुषी वर्चस्वातुन आलेल्या मानसिकतेला शह द्यायचा आहे .त्यांनी केलेला हल्ला मग तो असिड ,अत्याचार ,घाणेरडे कमेंट ,स्पर्श, हावभाव,FGMसारख्या पद्धति अन्यथा कोणत्याही प्रकारे असो ,अपणा सर्वाना तो नुसता परतावुन लावयाचा नाही तर तो पुनः निर्माणच होणार नाही याकडे लक्ष द्यावे लागणार आहे .म्हणूनच सांगतो फ़क्त वूमेन्स डे ला फेसबुक ,ट्विट्टर ,व्हाट्सऐप वर वूमेन्स डे ची लिंक ,फोटो ,कमेंट टाकले की आपले काम खरेच संपते का? खरच याचा विचार प्रत्येकाने करावा .दररोज़ एक ,एक पाऊल जरी या दिशेने टाकले तरी ''मंज़िल दुर नहीं है मेरे यार। ''  

Friday, 7 March 2014

अपयश

अपयश च्या  गर्तेत  जीवाचा  कोंडमारा  होत आहे  ,                                                                                        अपेक्षाच्या  ओझेखाली  जीव  मेटकुटीला येत  आहे .                                                                                           कोण  आपले? कोण  परके ? यातील फरक हळूहळू    नाहीसा  होत आहे ,                                                        आपले  म्हणणारेच  "आपले " आता  आपली  साथ  सोडत  आहेत .                                                         अपयश ! अपयश !!  अपयश!!! अपयशाच्या  फेरयात  आता  मी  पुरता  गुरफटलो  आहे ,                               यशाच्या  पहाटेची  चातकाप्रमाणे  वाट  पाहत आहे .                                                                                        अपयशाचे हे कडु विष पचवत ,पचवत  मी पुढे  जात आहे ,                                                                             यातच माज़े आयुष्य  मात्र  हळुहळु संपत आहे .                                                                                   आयुष्याच्या वळणावर आलेल्या अपयशाला  आता जीव घाबरला  आहे ,                                                        जगण्याची जिद्द कदाचित तो हरवून  बसला आहे .                                                                                            जीवनाच्या  सारिपटावर    असा हा  माझा  खेळ  चालू  आहे ,                                                                         नशिबालाही आव्हान देणारा मी ,आता  मात्र  त्याला  शरण आलो आहे .                                                           पण  जा ,जाऊंन  सांगा  त्याला हे अपयशाचे  हलाहल  पचवून अजूनही मी उभा आहे ,अपयश विरुद्ध लढण्यची  अजूनही  जिद्द  बाकी  आहे                

Monday, 24 February 2014

फैन्द्री… एक संघर्ष

वार मंगलवार , तो  दिवस जरा कंटाळवणाच होता. जयवंत आले ते फैन्द्री मराठी चित्रपट पाहण्याचा आग्रह करितच … त्यांना होकार देऊन करमणूक म्हणून पाहिलेला असा हा फौंड्री मराठी चित्रपट.


 अस्पृश, पद्द्द्लित समाजातील दलित वर्गाबद्दल बरेच लिखाण, चित्रपट  आले  आहे पण त्याच गटातील 'वडार' या समाजाला तसे दुर्लक्षित म्हणूनच पाहिले गेले आहे. चित्रपट सुरू होताच जास्त विलंब न लावता हळूहळू समाजातील भीषण अश्या वर्णव्यवस्तेचे चित्रण सादर करतो, मग ते रामोश्याचे पोर आले असा उल्लेख करणे असो वा डुक्कर शिवले की अंघोळ करणे असो … सर्वात विशेष म्हणजे हे सर्व आजही घडते आहे .

 चित्रपट पुढे कास धरायला सुरवात करतो. आपल्या समाजातील हि वर्णव्यवस्था मुळातच कर्मावर आधारित निर्माण झाली तरी पण, अमुक एक श्रेष्ठ , कनिष्ठ असा भेदभाव पाहताच लहानाचे मोठे होणारे आपण… याच विषयावर चित्रपट बोट ठेऊ  पहातो.

डूकाराने  शिवले म्हणून आंघोळ करणारी आणि त्यांना ते डुक्कर शिऊ नये म्हणून त्या डुकरांचा बंदोबस्त करणारी माणसे यातील संघर्ष दिग्दर्शकाने पोटतिडकीने दाखवला आहे. हा संघर्ष सर्व माणुसकीच्या चौकटीच्या पलीकडे जाऊन जाउन पोहचलेला आपणास दिसतो. हा संघर्ष जगण्यासाठी नाही तर माणूस म्हणून सन्मानाने जगण्यासाठी आहे. " जातीसाठी खावी माती " असे म्हणतात, पण जर माती खाणच जर सत्य असेल तर हे सत्य शिवाहून सुंदर असूनही त्याचा काय उपयोग ?

सर्व आयुष्य वेदना सहन करण्यात गेलेले असताना म्हातारपणी चार सुखाचे दिवस बघण्याचा कचरु ला अधिकार का नाही? एक मुलगी नवऱ्याने सोडलेली ,दुसरीच्या लग्नाला हुन्द्यसाठी धावपळ, घरातील सर्वांचे पोटे भरण्यासाठी केलेली वणवण असा हा आयुष्यभर पुरेल एवढाच नाही तर मेल्यानंतरही पाठ न सोडणारा संघर्ष अंगावर काटा आणतो. एकट्या कचरूने संघर्ष करायचा तरी किती? आणि कोणाकोणा बरोबर ?

अशा या संघर्ष्यातून निर्माण होणाऱ्या वेदना मग त्या कचरुच्या असोत वा जब्याला जत्रेत नाचू न देता दिवा घेऊन उभा केल्यान झालेल्या जब्याच्या वेदना असोत, अश्याच वेदना सहन करून आता त्यातून नवीन पिढीत आलेला  नकार आपणास जब्यात दिसतो. हा नकार म्हणजेच प्रतिष्ठिताण विरुद्ध पुकारलेले बंडच होय. हे धाडस आता नव्या पिढीत दिसू लागले आहे. जब्याने पाटलाच्या हौदातील डुक्कर काढण्यास दिलेला नकार, शाळेतील मुलांसमोर डुक्कर पकडण्यास सुरवातीला नकार यातून ऎक बदलाच्या वाऱ्याची छोटीशी झुळूक वाहताना पहावयास मिळते.

विचार केल्यास हा नकार कश्यासाठी असा  मला प्रश्न पडतो. तर इतके वर्ष सहन करून आता आत्मभान जागे झाले आहे , या व्यवस्थेविषयी चिडच नव्हे तर या व्यवस्थेलाच आव्हान देण्यासाठी या नकार द्वारे उचलले हे मुंगीचे पाऊलच आहे. समाज्यात  सन्मानाने जगता यावे यासाठीच्या ओढीतून आलेला हा नकार आहे. शालू देखील येथे उच्चवर्णीयांचीच प्रतिनिधी असल्याचे जाणवते कारण जब्याची सन्मानाने जगण्यासाठीची धडपड तिलाही करमणूकच वाटते.

शेवटी जागृत झालेल्या आत्मभानाने वर्णव्यवस्था, जात, पात यावर भिरकावलेला दगड अतिशय योग्य असा शेवट. भिरकवलेला दगड हा कशाचे प्रतिक आहे? हे विचार करायला लावणारा आहे. नाठाळाच्या माथी मारलेली काठी म्हणजे हाच तो दगड तर नाही ना… ? चित्रपटात भव्यदिव्य सेट न दाखवता, समाजाची दुखरी नस पकडून दिग्दर्शकाने चित्रपट चाकोरी बाहेर विचार करायला लावणारा बनवला आहे. वेदना,विद्रोह,संघर्ष ,नकार आणि त्या नकारातून जागे झाल्यावर प्राप्त झालेल्या अत्मभानाने भिरकवलेला दगड थेट पाहणार्यांच्याच काळजावर कायमचा वार करून जातो….