Thursday, 11 August 2016

शोधल की सापडतच.

शोधल की सापडतच.


त्या दिवशी कामातुन जरासा फुरसद भेटली म्हणुन व्हाॅटसअप च्या जगात डोकावण्याचा मोह झाला,ग्रुप मधील मेसेजेस चेक करता-करता एका मेसेज वर नजर अडकली ,
“पोकिमन पकडण्याच्या नादात ..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
राज ठाकरे मातोश्रीत....
.
.
.

खरा पोकेमॉन बारामतीत लपला असल्याचे मातोश्रीवरुन स्पष्ट ....”

राज आणि उद्बव यांच्या भेटीवर,पोकेमाॅनद्वारे मिश्किलभाष्य करणारा मेसेज वाचुन झाला पण पोकेमाॅन काही माझ्या डोक्यातुन बाहेर पडता पडेना कारण आजकाल पेपर,टिवी,काॅलेजकट्टा,आॅफिस मधील चर्चेमध्ये आवडीने चघळला जाणारा विषय पोकेमाॅन ठरु पहातोय.काय,कसा आहेस ? ऐवजी किती पोकेमाॅन सापडले? असे प्रश्न ऐकमेकांना विचारले जात आहेत आणि म्हणुनच काय की या विषयावर राज्याच्या विधानपरिषदेत ही चर्चा घ्यावी लागली यावरुनच या विषयाचे गांभिर्य आपण लक्षात घ्यावयास हवे.
       ९०च्या दशकात पोकेमाॅन च्या प्रथम आव्रृत्ती ने मुलांच्या मनावर गारुड केले होते आता जपानी कंपनी नितांदो यांनी विकसित केलेला ‘पोकेमॉन गो’  या लोकेशन बेस्ड ऑगमेंटेड रिअॅलिटी गेमनं सध्या जगभरात अनेकांना अक्षरश: ‘याड लावलय’.पोकेमाॅन गो गेम ची ही आयडिया २०१४च्या गुगल च्या ‘एप्रिल फुल’ जोक वरुन घेण्यात आली आहे .अधिकृतरित्या हा गेम सध्या फक्त अमेरिका,आॅस्ट्रेलिया,न्युझिलंड इ.देशांमध्येच उपलब्ध आहे,जरी हा गेम भारतात उपलब्ध नसला तरी पायरेटेड व्हर्जन वापरणार्याची संख्या वरचेवर वाढत आहे,जी चिंतेची बाब ठरत आहे कारण, पोकेमाॅन पकडण्यासाठी तरुणाई भान हरवुन गार्डन,रेल्वेमार्ग,समुद्रकाठ,हायवे वर अपघाताला निमंत्रण देत आहेत.कॅनडामध्ये तर पोकेमाॅन पकडण्याच्या नादात एकजण अमेरिकेत जाउन पोचला तर, तिकडे न्युझिलंड मध्ये १५० पोकेमाॅन पकडण्याचा चंग पुर्ण करण्यासाठी एका पठ्ठ्याने सरळ सरळ नोकरीचा राजीनामाच देउन टाकलाय. आपल्या भारतात ही काही वेगळे चित्र नाहीय मुंबई मध्ये एक मुलगा पोकेमाॅन पकडता -पकडता चक्क महिला स्वच्छताग्रृहातच जाउन पोचला.या शारिरिक,मानसिक धोक्यांबरोबरच मोबाईल डाटा,लोकशन ई.महत्त्वपुर्ण माहिती असुरक्षित हाती पोचण्याचा धोका संभवतो कारण iOSप्रणालीवर ही गेम डाउनलोड करताना तुमचा डेटा वापरण्याची परवानगी मागितली जात नाही.
      पोकेमाॅन ने पहिल्या आठवड्यातच जवळपास ६५ दशलकक्ष दररोज वापरकर्त्याचा टप्पा ओलांडलाय तर ३% पेक्षा जास्त अमेरिकन याचा रोज वापर करत आहेत.याचा फटका फेसबुक,ट्विटर यांना तर बसलायच पण नितांदो कंपनीच्या शेअर चे भाव ५०% नी वाढलेत तरी अजुन पोकेमाॅन काही देशापुरताच मर्यादित आहे यावरुनच पोकेमाॅनरुपी त्सुनामीची आपल्याला कल्पना येते.
      मानसोपचारतज्ञाच्या मते हा गेम खेळताना मुलांच्या मेंदूतील अनेक अवयव जागृत करण्याची गरज असते. यात एकाग्रता, हालचाल, चपळता, अचूकता अशा अनेक क्रिया कराव्या लागतात. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भ्रमणध्वनीच्या स्क्रीनकडे पाहातच चालत जावे लागत असल्यामुळे खेळताना मुलांना आजूबाजूचे भान राहत नाही. यामुळे इतर संकटांनाही आमंत्रण देणारा हा खेळ ठरेल, त्याचबरोबर मैदानी खेळातील शारिरिक हलचालीच्या अभावाने स्थुलता ही वाढेल,म्हणुनच पोकोमॅन हा गेम न रहाता तो एक सामाजिक मुद्दा होतो जो जगातील सर्वात जास्त तरुणांची संख्या असणार्या देशाला आभासी जगात गुंतवु पहातोय.वास्तवातील लहान-लहान गोष्टीतुन मिळणार्या सुखाला डावलुन कल्पनेतील सुख मिळवण्यासाठीच तर ही शोधा,शोध नसेल ना?
      एकुणच काय तर,वास्तवातील सत्याला नाकारुन मानवी कल्पनाशक्तीचा जोरावर आभासी जीवनात स्वप्नाचे ईमले बांधणारी आजची ही तरुणाई यातच रमु पहात आहे,कारण या आभासी जीवनात नसतो झगडा भाकरीच्या चंद्रा साठीचा.