Wednesday, 28 October 2015

जीवनाचा प्रवास.


                जीवनाचा प्रवास


जीवनाचा प्रवास एका अजब वळणावर आला आहे.
काल जे सोबत होते ते आज नाहित ,
उद्या जे सोबत देणार आहेत,ते हि आज नाहित
आज मात्र मी, एकटाच प्रवास करणार आहे.


जीवनाचा प्रवास एका अजब वळणावर आला आहे.
जे येतील त्यांना घेउन,
जे येणार नाहित त्यांच्याविना,
आज मात्र मी,एकटाच प्रवास करणार आहे.


जीवनाचा प्रवास एका अजब वळणावर आला आहे.
जीवलगांच्या आठवणी मनात साठवत,
कोसळलेल्या दु:खाचे हलाहल पचवत,
आज मात्र मी, एकटाच प्रवास करणार आहे.


जीवनाचा प्रवास एका अजब वळणावर आला आहे.
जन्मानंतर सुरु झालेला हा प्रवास ,
आता वेगाने शेवटाकडे जात आहे,
आज मात्र मी, एकटाच प्रवास करणार आहे..


©S.Suresh
Plz visit http://shrinivasdeshpande.blogspot.in

Monday, 26 October 2015

वेडा प्रेमी.......


                      वेडा प्रेमी.......

किती आठवण काढली,आता कुठे  भेटलीस तु.

उशीरा का होईना पण ,शेवटी भेटलीस तु.

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,साथ मला देशील तु?

दुखाच्या सारीपाटावर ,सुखाचा डाव मांडशील तु?

या गरीबाची चटणी —भाकर गोड मानशील तु?

या वेड्या प्रेमी कडे एखादी तरी नजर टाकशील तु?

माहित नाहि ,माझ्या या प्रश्नांची उत्तरे काय असतील?

पण यावरच माझ्या उरलेल्याआयुष्याचे दिवस तर नसतील??


                                                                 © S.Suresh.

Wednesday, 21 October 2015

माझे अस्तित्व

                         माझे अस्तित्व

माझे अस्तित्व नकारणार्यासाठी कदाचित मी संपलेला असेन,

सर्व काहि असुनहि मी फक्त त्यांच्यासाठीच संपलेला असेन.

संपलेल्याचे संपलेपण म्हणुनही मी कदाचित त्यांना बोचत असेन,

या बोचलेपणाच्या भांडवलावरच मी त्यांच्यासाठी अस्तित्वात असेन...

                                                                            © S.Suresh.