Sunday, 8 March 2015

महिला दीन नाहि , महिला दिन होय

       कंटाळा आला म्हणुन टिव्हि वरील 'क्राईम पेट्रोल ' मालिका पहात होतो.कथा प.बंगाल मधील होती.गावात नविनच आलेला पहुणा त्या गावातील दहावीत शिकणार्या मुलीला स्वताच्या प्रेमात फसवुन लग्नाचे खोटे आमिश देवुन मुम्बई ला नेउन विकतो.पुढे पोलिस त्याचा छडा लावुन त्या मुलीला सोडवुन आणतात.म्हणतात ना ,"शेवट गोड तर ,सर्वच गोड". अशा रितीने तो कार्यक्रम समाप्त होतो तो , माझ्या डोक्यात विचारांचे चक्र चालु करुनच ...
         अशा एकच नाहि तर अनेक भुतकाळात घडलेल्या एक -एक घट्नाचा पट माझ्या नजरे समोरुन पुढे सरकत रहातो.मलाला ,निर्भया पासुन सुरु झालेला किम्बहुना, त्याहि कितीतरी आधिपासुन सुरु झालेला असला प्रवास या आताच्या घटनेपाशी येउन थाम्बतो.
काय शिकलो आपण या घटनांतुन ? मनुष्य हा सर्वात बुद्धिमान प्राणी आहे असे बिरुद मिरवणारे आपण ,काय शिकलो या घटनांतुन ? नाहिय काहि उत्तर आपल्याकडे.या अशा रोज घडणार्या घटनातुन आपण काहि शिकतच नाहि कि काय ?मग स्वतला बुद्धिमान प्राणी
म्हणायचा अट्टहास कशासाठी? चुकांतुनच शहाणपण येते ,हेही विसरलोत की काय आपण?
        शाहु -फुले -आबेड्कर -कर्वे याच्याच मातीत जन्माला आलेलो आम्ही ,त्याच्याच विचाराना 'तिलंजाली 'द्यायला निघालो आहोत असेच दिसतेय.असेच आपण जात राहिलो तर महासत्ता होणे तर दुरच, पण तसा विचार करणे हि व्यर्थ होय.
रोटी ,कपडा ,मकान या मुलभुत गोष्टिचा जेव्हा विचार करतो तेव्हा ,त्यात स्त्रियाना   सामाजिक सुरक्षा या मुलभुत गोष्टि कडे अगदि सहज कानाडोळा करतो.महिलान वरिल असे अत्याचार हे सामाजिक सुरक्षा आणि समाजाचि वैचारिक पातळी च्या अभावाने होत आहेत कारण ,या दोन्हि एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत.म्हणुनच सामाजिक सुरक्षा साठी सर्वोउत्तम कायदे आणि समाजाचि वैचारिक पातळी उचावण्यासाठी उत्तम शिक्षण आश्या दोन्हि पाताळीवर लढायचे आहे.एकुणच प्रश्न जटिल आहे ,पण कोणत्याहि एका प्रकारे विचार करुन समस्येचे निराकरण होणार नाहि ,तर सर्वच बाजुनी सारासार विचार करावा लागेल.
         जुन्या रुढि ,परम्पराना छेद देत महिला आता सर्वच क्षेत्रात पुढे येत आहेत उदा.-अरुंधती भाट्टाचार्य (भारतीय स्टेट बेक ),चंदा कोचर (ICICI Bank )ई.नव्हे तर ईतर अनेकानी आपापल्या क्षेत्रात यशाची अनेक शिखरे पादाक्रांत करीत आहेत,यासाठी त्याना प्रोत्साहना बरोबरच सुरक्षित वातावारण निर्माण करावयास हवे .जेणेकरुन महिला निसंकोच पणे पुढे येतील .
          'बेटी बचाओ' , 'सुकन्या सम्रुद्धि'  सारख्या योजनांची घोषणा करण्यापुरती सरकारचे काम मर्यादित न रहाता, त्या योजना समाजाच्या तळागाळा पर्यंत राबवल्या जात आहेत का? त्यांचा फायदा समाजातील शेवटच्या व्यक्ती पर्यंत होतो आहे का ?हे पहाणे जरुरीचे आहे. कायदे करणे जितके सोपे तितकेच त्यांची अमलबजावणी करणे अवघड असते.म्हणुनच प्रत्येक महिला दिन ला बौधिक प्रवचन न होता प्रत्येकाने स्वतपुरती का होईना अमलबजावणी करावी .
           अचानक भानावर आलो,पहातो तर काय, टि व्हि चालुच होता .एक कार्यक्रम सम्पुन दुसरा सुरु झाला होता .पण माझ्या डोक्यातील विचारांचे माजलेले काहुर सम्पता सम्पेना .खुप रात्र झाली होती टिव्हि बंद करुन मीहि झोपावयास गेलो ,खिडकितुन बाहेर पाहिले निरव शांतता पसरली होती .सर्व जण "गाढ " झोपले होते उद्याचा  सुर्योदय होण्याच्या आशेवर ........मीहि मग झोपलो सुर्योदय होण्याच्याच आशेवर,असा सुर्योदय की ज्यात माहिला खर्या अर्थाने स्वतंत्र असतील .