स्वप्नातील ती …
आज ही रात्री, तु नेहमी प्रमाणे माझ्या स्वप्नात यावेफुलासारख्या तुझ्या मखमली हातांनी मला थापाडावे… ।।१।।
तिथे कोणीही नको ,फक्त मी तु अन तु ,मी
तिथ तू फक्त माझीच अन तुझाच मी… ।।२।।
सागर ज्या प्रमाणे नदीचा भेटीसाठी तरसतो ,
स्वप्नांमध्ये तुझा मांडीवर डोके ठेवणारा मी, जगालाही क्षणभर विसरतो… ।।३।।
रोज तू यावे स्वप्न्यात अन मी हि तुझ्यात रंगून जावे ,
तुझा मांडीवर डोके टेकवून आपल्या संसाराचे चित्र रंगवावे… ।।४।।
संसाराचे चित्र रंगवताना तुझा केसांची बट सारखी मध्ये च तुझ्या गालावर का बर येते ?
तिला सारखी बाजूला करता करता मला मात्र स्वप्नातून जाग येते .. मला मात्र स्वप्नातून जाग येते… ।।५।।
S..Suresh...